शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 16:18 IST

तीन लाख रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने  शुक्रवारी (दि.१६) बाजार समितीच्या मुख्य कार्यालयातून अटक केली आहे. 

ठळक मुद्देशिवाजी चुंभले यांना लाच स्विकारताना अटक कृषी उत्पन्न बाजार समीतीत रंगेहात पकडलेलाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

नाशिक : कृषी उत्तन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना कंत्राटी कामगारांना नियुक्तीपत्र देण्याच्या बदल्यात तीन लाख रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने  शुक्रवारी (दि.१६) बाजार समितीच्या मुख्य कार्यालयातून अटक केली आहे. बाजार समितीतील कंत्राटी कामगारांना नियुक्तीची प्रक्रिया सुरू असून या प्रक्रियेअंतर्गत नियुक्तीपत्रासाठी बाजारसमितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांच्याकडून संबधित कामगारांकडून रोख रकमेची मागणी होत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्यानुसार एसीबीच्या अधिकारºयांना बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात सापळा रचून चुंभळे यांना लाच स्विकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणात कंत्राटी कामगाराकडून  चुंभळे यांनी १० लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ३ लाख रुपयांची रक्क ठरली. मात्र संबधित कामगाराने या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाही दिली. त्यामुळे ठरलेली रक्कम सुपुर्द करण्यासाठी संबधिक कर्मचारी बाजार समितीच्या मुख्यालयात गेला असता एसीबीच्या अधिकाºयांना सापळा रचून चुंभळे यांच्यावर नजर ठेवली आहे. यावेळी चुंभळे यांनी तीन लाखाची रक्कम स्विकारताच अधिकाºयांनी कारवाई करून त्यांना अटक केली. या कारवाईमुळे शिवाजी चुंभळे यांच्या अडचणीत वाढ निर्माण झाली असून त्यांची राजकीय कारकीर्दही धोक्यात आली आहे.शिवाजी चुंभळे यांनी महापालिकेत नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती अशी पदे भूषविली असून गेल्यावेळी त्यांनी ते विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी करून प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर कडवे अव्हान निर्माण केले होते. त्याचप्रमाणे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ते शिवसेनेकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात तयारी करून प्रतिस्पर्धी उमेदवारांना आव्हान निर्माण केले होते. परंतु, त्यांना लोकसभेचे तिकिट मिळविण्यात यश आले नसले तरी ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करती असताना अशा प्रकारे त्यांना अटक झाल्याने हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का मानला जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती