शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आधीच तिढा सुटेना, त्यात नाशिकमध्ये नवे त्रांगडे; गावित अन् शांतिगिरी महाराज यांचे अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 09:35 IST

शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीला देखील धक्का असल्याचे मानले जात आहे.

नाशिक - लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघातून माकपाचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडी, तर नाशिकमधून शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी दाखल केल्याने महायुतीला धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी २० मे राेजी मतदान होणार असून, त्यासाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. नाशिकमध्ये पहिल्याच दिवशी तीन अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

हेमंत गोडसेंनीही नेला अर्ज  नाशिकमधून अन्य ६४ इच्छुकांनी अर्ज नेले असून त्यात विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचाही समावेश आहे. महायुतीकडून अद्याप उमेदवारीची घोषणा झाली नसताना गोडसे तसेच अन्य इच्छुकांनी देखील अर्ज नेले आहेत. मनसे आणि शिंदेसेनेच्या संपर्कात असलेल्या प. पू. शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीला देखील धक्का असल्याचे मानले जात आहे. महाराज यांनी नाशिकमधून प्रथमच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

प्रीतमबद्दल मी गमतीने म्हटले होते; नाशिककरांनी अस्वस्थ होऊ नये : पंकजा 

काळजी करू नका, प्रीतम मुंडे यांना नाशिकमधून उमेदवारी देईन, असे वक्तव्य आपण गंमतीने केले होते. नाशिकमधील लोकांनी अस्वस्थ होण्याची गरज नाही. तसेच, छगन भुजबळ यांनी दिलेला सल्ला मी वडिलकीच्या नात्याने स्वीकारते, असा खुलासा बीडमधील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केला. पालकमंत्री तथा भाऊ धनंजय मुंडे यांच्याबाबतही पंकजा यांनी वक्तव्य केले. २०१४ मध्ये त्यांनी जीव तोडून विरोधात प्रचार केला. जसा तेव्हा विरोध केला तसा आता प्रचार करत आहेत. 

टॅग्स :nashik-pcनाशिकMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४