शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘नाशिक’ नेमके यांचे, त्यांचे की कुणाचे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 11:51 IST

Nashik Lok Sabha Constituency: नाशिकच्या उमेदवारीबाबतचा संभ्रम आणखी वाढला असून, सोमवारी याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. 

नाशिक - लोकसभेच्या नाशिकच्या जागेवरून राजकीय खल अजूनही सुरूच आहे. शिंदेसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्याला उमेदवारीचे आश्वासन दिल्याचे सांगत शालिमार चौकात श्री हनुमानाची आरती केली, तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्या उमेदवारीबाबत काही महिन्यांपूर्वी दिल्लीत महायुतीची बैठक झाली आणि त्यावेळेपासूनच आपल्याला लोकसभा निवडणुकीत उमेदवारीचा प्रस्ताव देण्यात आला, असा दावा केला आहे. त्यामुळे नाशिकच्या उमेदवारीबाबतचा संभ्रम आणखी वाढला असून, सोमवारी याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. 

नाशिकच्या जागेसाठी महायुतीतील भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गट हे तिघेही दावेदार आहेत. भाजपला ही जागा हवी असली तरी उमेदवार म्हणून कोण असेल, हे स्पष्ट नाही, तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांचे नाव पुढे आले आहे. साहजिकच शिंदेसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी मुंबईत दोनदा शक्तिप्रदर्शन केले. शुक्रवारी गोडसे मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आल्यानंतर त्यांच्या आश्वासनाच्या आधारावर त्यांनी नाशिकमध्ये शनिवारी श्री हनुमानाला साकडे घातले. 

नाशिकमध्ये जवळपास तीन आमदार आणि ७० नगरसेवक भाजपचे आहेत.  नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला आहे. - गिरीश महाजन, मंत्री, भाजप  महाजन संकटमोचक आहेत, त्यांनी शेपटीला चिंधी लावून महायुतीत व्यत्यय आणून नये. जे रामराज्य सुरू आहे ते सुरू राहू द्या.- संजय शिरसाट, शिंदे गटाचे प्रवक्तेदिल्लीत महायुतीची बैठक झाली. त्यात नाशिकमधून मी उमेदवारी करावी यासंदर्भात प्रस्ताव देण्यात आला. आता महायुतीत योग्य तो निर्णय होईल.  - छगन भुजबळ, नेते, अजित पवार गट

टॅग्स :nashik-pcनाशिकMahayutiमहायुतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४