शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: रो-हाऊसमध्ये शिरला बिबट्या, पथकाला बघून गवतात पळला; नाशिकच्या ध्रुवनगर भागात थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 17:10 IST

नाशिकमधील ध्रुवनगर भागात बिबट्या एका बांधकाम सुरू असलेल्या एका रो-हाऊसममध्ये शनिवारी दुपारी बिबट्या घुसला. त्याला पकडण्यासाठी पथक आल्यानंतर एकच तारांबळ उडाली. 

Leopard in Nashik: नाशिक शहरातील ध्रुवनगर भागात एका गृह प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. इथे असलेल्या एका वॉचमनला बिबट्याचे दर्शन झाले. वॉचमनने बिबट्याला तेथील एका बांधकाम सुरू असलेल्या रो-हाऊसमध्ये शिरताना बघितले. त्यानंतर परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी नाशिकवनविभागाचे पथक दाखल झाले असून शोध घेतला जात आहे.

नाशिकमध्ये पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली. शनिवारी (२८ मार्च) दुपारी एका बांधकाम सुरु असलेल्या प्रकल्पातच बिबट्या शिरला. त्यामुळे कामावर असलेल्या मजुरांसह सगळ्यांनाच घाम फुटला. 

लोकांची इमारतींवर गर्दी

परिसरात बिबट्या घुसल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर लोकांनी इमारतींच्या छतावर बिबट्या बघण्यासाठी मोठी गर्दी केली. लोकांची गर्दी वाढल्याने गोंगाटही वाढला. लोकांचा आवाज वाढल्याने रो हाऊसमध्ये घुसलेला बिथरला आणि त्याने रो-हाऊसमधून उडी मारून बाहेर पळाला. 

बाजूच्या रानगवतात शिरला बिबट्या

गृह प्रकल्पाच्या बाजूला रानगवत मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. गोंगाटामुळे बिबट्या बिथरला अन रो हाऊस मधून बाहेर उडी घेत आजूबाजूला असलेल्या रानगवतात पळाला. रानगवत भरपूर उंच असल्याने आणि बिबट्याकडून हल्ला होण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी जेसीबीच्या सह्याने झाडीझुडूपे काढून बिबट्याला रेस्क्यू करण्याचे काम वनविभागाकडून सुरू करण्यात आले. 

या झाडीझूडपामध्ये बिबट्याने आश्रय घेतला असून चारही बाजूने रहिवाशांची घरे असून बिबट्या बिथरल्यास परिस्थिती धोकादायक बनू शकतो. वनविभागाचे नाशिकच्या गंगापूरजवळच्या ध्रुवनगर भागात ऑपरेशन सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard enters Nashik row house, escapes into nearby bushes.

Web Summary : A leopard sparked panic in Nashik's Dhuvanagar after entering a row house under construction. The frightened animal fled into nearby bushes, prompting a rescue operation by the forest department amidst a crowd.
टॅग्स :leopardबिबट्याLeopard Attackबिबट्याचा हल्लाNashikनाशिकforest departmentवनविभाग