नाशिक: शहरातील गांधी नगर येथे विमानातून पॅराशूटद्वारे जमिनीवर उडी मारण्याचे प्रात्यक्षिक करणाऱ्या एका जवानाला भलताच त्रास सहन करावा लागला. त्याचे पॅराशूट उपनगर येथील एका बाभळीच्या झाडावर अडकले. काट्याकुट्यात अडकलेल्या जवानाची नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड तोडून सुटका केली. आज सकाळी साडेनऊ वाजता हा प्रकार घडला.आर्टिलरी सेंटर येथील केंद्रात वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. त्याअंतर्गत विमानातून पॅराशूटद्वारे उतरण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. असे प्रशिक्षण घेत असलेल्या काही जणांनी आज सकाळी एका विमानातून 13 हजार फुटांवरून उडी मारली. त्यापैकी हनिफ नापा या लष्करी जवानाचे पॅराशूट वारा सुटल्याने भरकटले. यानंतर हनिफ नापा उपनगरातील अमित काठे यांच्या शेतात असलेल्या बाभळीच्या झाडावर अडकले.
VIDEO: पॅराशूट भरकटल्यानं जवान झाडावर अडकला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 11:29 IST
अग्निशमन दलानं झाड तोडून जवानाची केली सुटका
VIDEO: पॅराशूट भरकटल्यानं जवान झाडावर अडकला अन्...
ठळक मुद्देपॅराशूटद्वारे जमिनीवर उडी मारण्याचे प्रात्यक्षिक करताना घडली घटनाअग्निशमन दलाच्या जवानांकडून सुखरुप सुटकाझाड तोडून जवानाची सुटका; जवानाला कोणतीही इजा नाही