शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
2
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
3
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
4
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
5
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
6
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
7
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
8
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
9
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
10
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
11
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
12
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
13
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
14
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!
15
'पुण्याला जातो' सांगून गेलेल्या अंडर-१६ खेळाडूचा जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलमुळे पटली ओळख!
16
सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी
17
हार्दिक पांड्याने खरंच माहिका शर्मासोबत साखरपुडा केला? पूजाविधी करणारे पंडितजी म्हणाले...
18
आलिशान कार, गर्लफ्रेंड, चोरी, नाकाबंदी... नर्सिंगची विद्यार्थिनी बनली बॉयफ्रेंडची क्राइम पार्टनर
19
Pune Video: "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा
20
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये पतीने खलबत्त्याची मुसळी डोक्यात मारून पत्नीचा राहत्या घरात केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 22:23 IST

यावेळी मुलगी धनश्री ही आपल्या खोलीमध्ये होती. यावेळी अण्णासाहेब याने घराचा दरवाजा व सर्व खिडक्या बंद केल्या. मद्यधुंद असलेल्या संशयित गायखे याने स्वयंपाकघरातून खलबत्त्याची लोखंडी मुसळी घेऊन पत्नी सवितावर हल्ला केला.

ठळक मुद्देसंतप्त झालेल्या गायखेने मुलगा अजिंक्य (२४) वर मुसळीने प्रहार केला. आईला वाचविण्यासाठी धाव घेतलेल्या मुला-मुलीवरही गायखे याने मुसळीने मारून त्यांना गंभीर जखमी केले.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अण्णासाहेब गायखे यास ताब्यात घेतले.

नाशिकरोड : जेलरोड शिवरामनगर येथील बंगल्यामध्ये बुधवारी (दि.१०) रात्रीच्या सुमारास गांधीनगर मुद्रणालय कामगार अण्णासाहेब निवृत्ती गायखे (५०) याने पत्नी सविता (४५)हिच्या डोक्यात मुसळीने मारून निर्घूण खून केला. यावेळी आईला वाचविण्यासाठी धाव घेतलेल्या मुला-मुलीवरही गायखे याने मुसळीने मारून त्यांना गंभीर जखमी केले.जेलरोड शिवरामनगर येथील अपुर्वा क ॉलनीमध्ये राहणा-या बंगल्यात गायखे हे कुटुंबासमवेत राहत होते. बुधवारी रात्रीच्या सुमारास गायखे कुटुंबिय सर्व राहत्या घरात टिव्ही बघत होते. यावेळी मुलगी धनश्री ही आपल्या खोलीमध्ये होती. यावेळी अण्णासाहेब याने घराचा दरवाजा व सर्व खिडक्या बंद केल्या. मद्यधुंद असलेल्या संशयित गायखे याने स्वयंपाकघरातून खलबत्त्याची लोखंडी मुसळी घेऊन पत्नी सवितावर हल्ला केला. यावेळी झालेल्या आरडाओरडीमुळे मुला-मुलीने बैठक खोलीत धाव घेतली. संतप्त झालेल्या गायखेने मुलगा अजिंक्य (२४) वर मुसळीने प्रहार केला. दरम्यान, गायखेने मोर्चा धनश्री (२१)च्या दिशेने वळविल्यानंतर जखमी अवस्थेत अजिंक्य व आजुबाजूच्या नागरिकांनी तत्काळ गायखे यास ओढले. जवळच राहणाºया नातेवाईकांसह नागरिकांनी सदर घटनेची माहिती उपनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन बंगल्यातून अण्णासाहेब गायखे यास ताब्यात घेतले. जखमी मुलामुलींना नागरिकांनी त्वरित खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. अजिंक्य हा गांधीनगर मुद्रणालयात आंतरवासिया म्हणून कार्यरत आहे. धनश्री ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. संशयित अण्णासाहेब हा पोलीस कर्मचाºयाचा भाऊ असल्याची चर्चा आहे. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेऊन रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

टॅग्स :MurderखूनNashikनाशिकnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय