शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये घरफोड्यांचे सत्र : २ लाख ३४ हजारांचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 22:39 IST

शहरातील विविध भागांमध्ये दररोज घरफोड्यांचे गुन्हे घडत असून, संबंधित पोलीस ठाण्यांचा परिसरातील गुन्हेगारीवरील वचक कमी झाल्याचे बोलले जात आहे

ठळक मुद्देगंगापूररोडवर बंगल्यात एक लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज लुटला शिवाजीनगर परिसरात ४७ हजार रुपयांचा ऐवज लंपास सावतानगर भागात घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी २७ हजारांचा ऐवज लंपास

नाशिक : शहरातील विविध भागांमध्ये दररोज घरफोड्यांचे गुन्हे घडत असून, संबंधित पोलीस ठाण्यांचा परिसरातील गुन्हेगारीवरील वचक कमी झाल्याचे बोलले जात आहे. सातपूर, इंदिरानगर, अंबड, गंगापूर, सरकारवाडा, मुंबईनाका, म्हसरूळ, पंचवटी, उपनगर, देवळाली कॅम्प अशा सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या, सोनसाखळी ओरबाडणे, दुचाकी चोरीच्या घटनांनी डोके वर काढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

गंगापूर पोलीस ठाणेयेथील गंगापूररोडवरील कमल रो-हाउस सोसायटीमधील आठ क्रमांकाच्या बंगल्यात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. दागिन्यांसह लॅपटॉप असा एकूण एक लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लुटल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उत्तम संपतराव दळवी (६०) यांच्या मालकीच्या रो-हाउसमध्ये चोरट्यांनी शनिवारी (दि.२४) रात्री ११ वाजेच्या सुमारास प्रवेश के ला. घरामधील प्रत्येकी २० ग्रॅम वजनाची सोनसाखळी, ब्रेसलेट असे ८० हजारांचे दागिने व १५ ग्रॅमच्या सोन्याच्या ३५ हजार रुपये किमतीच्या दोन अंगठ्या, पंधरा हजारांचा लॅपटॉप, ३० हजारांची रोकड, असा एकूण एक लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

सातपूर पोलीस ठाणे हद्दनाशिक : येथील शिवाजीनगर परिसरातील भाग्यलक्ष्मी निवासमध्ये चोरट्यांनी प्रवेश करून सुमारे ४० हजारांच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे ४७ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवाजीनगर, सातपूर येथील रहिवासी प्रशांत दातीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित चोरट्यांनी मीनाताई ठाकरे उद्यानाजवळील शिवाजीनगरमधील भाग्यलक्ष्मी निवासात प्रवेश करून दोन हजार रुपयांची रोख रक्कम, दहा हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम सोन्याची अंगठी व दहा हजाराचे सोन्याचे पाच ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, दहा ग्रॅमची वीस हजार रुपये किमतीची सोनसाखळी, पाच हजाराचा मोबाइल असा एकूण ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक पाळदे करीत आहेत.

अंबड पोलीस ठाणे हद्दसिडको परिसरातील सावतानगर भागात बाहेरगावी गेलेल्या एका कुटुंबीयाच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी २७ हजारांचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे.रितेश सुरेश जगताप (३०.रा. राणेनगर) यांचे सासू-सासरे सावतानगर येथे राहतात. ते काही कामानिमित्त दहीसर, मुंबई येथे गेले असता चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून प्रवेश करत २२ हजारांची १५ ग्रॅम वजनाचे दागिने, चांदीचे जोडवे, साडेचार हजारांची रोकड, असा एकूण २७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जगताप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :theftचोरीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा