नाशिक गाइड जिल्हा संस्थेला विजेतेपदाचा मुकुट

By Admin | Updated: September 13, 2014 22:14 IST2014-09-13T22:14:50+5:302014-09-13T22:14:50+5:30

नाशिक गाइड जिल्हा संस्थेला विजेतेपदाचा मुकुट

Nashik guide district organization winner crown title | नाशिक गाइड जिल्हा संस्थेला विजेतेपदाचा मुकुट

नाशिक गाइड जिल्हा संस्थेला विजेतेपदाचा मुकुट


नाशिक : आदर्श नागरिकत्वाचे धडे विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच देणाऱ्या स्काउट / गाइड चळवळीत उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल नाशिक भारत स्काउट्स आणि गाइड्स या जिल्हा संस्थेला राज्यात प्रथम क्रमांकाची जनरल चॅम्पियनशिप नुकतीच जाहीर झाल्याची माहिती जिल्हा मुख्य आयुक्त नवनाथ औताडे यांनी दिली.
नुकत्याच झालेल्या सभेत राज्यातील सर्व जिल्ह्यांतील स्काउट/गाइड जिल्हा संस्थांनी गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी केलेल्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. विविध प्रकारांतील एकूण नऊ बक्षिसे एकट्या नाशिक जिल्हा संस्थेला मिळाली. राज्यातून कब, बुलबुल, स्काउट, गाइड, रोव्हर आणि रेंजर या प्रत्येक विभागाचे सर्वात जास्त नोंदणीचे प्रत्येकी प्रथम क्रमांकाचे बक्षीस नाशिक संस्थेनेच पटकावले. याशिवाय नाशिक विभागातून खरी कमाई उपक्रमासाठीचे प्रथम क्रमांकाचेही बक्षीस नाशिक जिल्हा संस्थेलाच मिळाले आहे. १९९७ पासून नाशिक जिल्ह्याला मिळालेला हा मान चालू वर्षीही कायम राहिला आहे.

Web Title: Nashik guide district organization winner crown title