नाशिक गारठले, पारा ६.५ अंशावर
By Admin | Updated: January 10, 2017 21:52 IST2017-01-10T21:52:41+5:302017-01-10T21:52:41+5:30
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिककर चांगलेच गारठले असून आतापर्यंत या हंगामातील ७.३ किमान तापमान सर्वात निचांकी असल्याची नोंद हवामान खात्याकडे होती

नाशिक गारठले, पारा ६.५ अंशावर
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 10 - जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिककर चांगलेच गारठले असून आतापर्यंत या हंगामातील ७.३ किमान तापमान सर्वात निचांकी असल्याची नोंद हवामान खात्याकडे होती; मात्र मंगळवारी नाशिकचा पारा थेट ६.५ अंशापर्यंत घसरला.
नवीन वर्षाच्या आगमनापासून नाशिककरांना थंडीचा कडाका अधिकाधिक जास्त प्रमाणात सहन करावा लागत आहे. या दहा दिवसांमध्ये नाशिकच्या किमान तपमानात सातत्याने घट होत असून गेल्या शनिवारी (दि.७) नाशिकचा पारा ७.३ अंशावर आला होता. तीन दिवसांत किमान तपमानात कमालीची घट झाली आहे. सोमवारी (दि.९) १०.३ इतके किमान तपमान नोंदविण्यात आले होते; मात्र आज मंगळवारी तपमान थेट ६.५ अंशावर आल्याने शहरवासीय गारठले असून थंडीची लाट अधिक तीव्र झाली आहे. वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून डॉक्टरांकडून पाणी गरम करुन पिण्याचा सल्ला दिला जात आहे.
गेल्या दहा दिवसांतील नाशिकचा पारा
- १ जानेवारी - ९.५
- २ जानेवारी - १०.०
- ३ जानेवारी - ८.८
- ४ जानेवारी - ७.९
- ५ जानेवारी - ८.०
- ६ जानेवारी - ८.३
- ७ जानेवारी - ७.३
- ८ जानेवारी - ९.१
- ९ जानेवारी - १०.३
- १० जानेवारी - ६.५
(छायाचित्र - प्रशांत खरोटे)