शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

मुसळधार पावसाच्या सरींनी नाशकातील रस्ते जलयम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 16:11 IST

नाशिक शहरात सोमवारी पावसाने सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जोर धरला असून पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्याने विविध भागातील रस्ते जलमय झाले. त्याचप्रमाणे शहरातील पाण्याच्या प्रवाह थेट गोदावरीला जाऊन मिळत असल्याने गोदावरीचा जलस्तरही काही प्रमाणात वाढला आहे.

ठळक मुद्दे नाशिक शहरात मुसळधार पावसाच्या सरीपावसामुळे शहरातील रस्ते जलमय जोरदार पावसामुळे नागरिकांची धावपळ

नाशिक : शहरात सोमवारी दुपारपासून सुरू असलल्या पावसाने सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जोर धरला असून पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्याने शहराती विविध भागातील रस्ते जलमय झाले आहेत. त्याचप्रमाणे शहरातील पाण्याच्या प्रवाह थेट गोदावरीला जाऊन मिळत असल्याने गोदावरीचा जलस्तरही काही प्रमाणात वाढला आहे.

नाशिक शहरासह पंचवटी परिसरात  यापूर्वी शुक्रवारी वारा व विजांच्या कडकडाटांसह पावसाने दमदारपणे हजेरी लावल्याने नागरिकांची त्रेधा उडाली. नाशिकच्या मुख्य बाजारपेठेसह मध्य नाशिकलादेखील पावसाने झोडपून काढले होते. हीच परिस्थिती सोमवारीही दिसून आली.  सायंकाळी चार वाजेच्या सुमारास झालेल्या पावसामुळे रस्त्यावरची वर्दळ पूर्णपणे ठप्प झाल्याने परिसरातील रस्ते काहीकाळ ओस पडल्याचे चित्र दिसून आले. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर गेल्या तीन ते चार  दिवसांत दमदार पाऊस झाला असून सोमवारी मेघ गजर्नेसह आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली.  बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांची त्रेधा उडाली. शहरात दुपारपासूनच पावसाची रिरिप सुरु असल्याने विक्रेते सावध असल्याने त्यांनी दुकाने लवकरच आवरती घेतल्याने बाजारपेठ काहीकाळ ओस पडली होती. काही भागांतील रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने परिसरातील रस्ते जलमय झाले होते, तर सखल भागातील रस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. शहरातील मेनरोड, दहीपूल, पंचवटीतील हिरावाडीरोड, जुना आडगावनाका, गणेशवाडी भाजी मंडई रस्ता, दिंडोरीरोड, गजानन चौक, अयोध्यानगरी, भागातील अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्यामुळे रस्ते जलमय झालेले दिसून आले. 

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिकWaterपाणीgodavariगोदावरी