शहरं
Join us  
Trending Stories
1
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
2
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
3
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
4
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
5
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
6
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
7
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
8
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
9
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
10
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
11
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
12
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
13
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
14
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
15
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
16
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
17
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं
18
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
19
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
20
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला

रिमझीम पावसाच्या सरींनी नाशिककर चिंब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 3:44 PM

सलग दोन दिवस जोरदार पावसाच्या सरी  कोसळल्यानंतर रविवारी पाससाने विश्रांती घेतली. परंतु सोमवारी (दि.२९) दुपारी एक वाजेपासून पुन्हा शहरात रिमझीम पावसाच्या सरी बरसल्याने नाशिककर पावसाच चिंब झाले.

ठळक मुद्देनाशकात रिमझीम पावसाच्या सरीपावसाच्या सरींनी नाशिककर चिंब

नाशिक : शहर व परिसरात शुक्रवारी व शनिवारी सलग दोन दिवस जोरदार पावसाच्या सरी  कोसळल्यानंतर रविवारी पाससाने विश्रांती घेतली. परंतु सोमवारी (दि.२९) दुपारी एक वाजेपासून पुन्हा शहरात रिमझीम पावसाच्या सरी बरसल्याने नाशिककर पावसाच चिंब झाले असून शहर व परिसरातील वातावरणात गारवा पसरला आहे.गेल्या तीन दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले असून रविवारी उसंत घेतल्यानंतर सोमवारी दुपारी पुन्हा शहरात पावसाच्या सरी बरसल्या. दोन दिवसांपूर्वी शहरात झालेल्या पावसाने रस्त्यांवर पाणी साचले होते. मात्र सोमवारी शहरात हलक्या स्वरुपाचा पाऊस असल्याने शहरातील विविध भागात चिकचिक झाली होती.  सोमवारी सकाळपासूनच नाशिककरांना प्रचंड उकाडा जाणवत असताना दुपारच्या सुमारास पावसाच्या रिमझीम  सरी कोसळल्या. त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सखल भागात पाणी साचले. त्यामुळे शहर परिसरातील मेनरोड, दहीपूल, रविवार कारंजा, शालीमार परिसरातील व्यापाऱ्यांनी त्यांची दुकाने आवरती घेतली . तर पावसामुळे ग्राहकांचीही वर्दळ रोडवल्याचे दिसून आले. दरम्यान, नाशिक शहर परिसरात पावसाची रिमझीम  सुरू असली तरी जुन महिना संपत आला असल्याने नाशिककरांना मुसळधार पावसाची प्रतिक्षा आहे. नाशिक जिल्हा प्रामुख्याने शेतीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाना तालुक्यांमध्ये भाताचे पिक घेतले जाते. त्यामुळे शेतकºयांना जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. अनेक ठिकाणी लावणीची कामे सुरू झाली असून शेतकºयांना वीजपंप व डिजेलच्या पंपांद्वारे पाणी देऊन भात लावणी सुरू आहे. त्याचप्रमाणे निफाज, सिन्नर तालुक्यांमध्ये सोयाबीन पेरणीसाठी पुरेशी ओल उतरण्यासाठी जोरदार पाऊसाची शेतकºयांना प्रतिक्षा आहे. 

टॅग्स :weatherहवामानNashikनाशिकRainपाऊस