शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

नाशिकमध्ये पाच दिवसांचा चिमुकला अन् दहा दिवसांची चिमुकली कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 21:48 IST

एकूणच जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून नाशिक शहरातही विविध उपनगरांमध्ये आता कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक

ठळक मुद्देनाशिक शहरात कोरोनाचे ३९ रुग्णशहरातील २७ उपनगरे प्रतिबंधीत क्षेत्र सर्वाधिक ५४८ रुग्ण हे मालेगाव महापालिका क्षेत्रात

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून सोमवारी (दि.११) जिल्ह्यात रात्री नऊ वाजेपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा ६९३ वर पोहचला. सोमवारी संध्याकाळी प्राप्त झालेल्या अहवालात धक्कादायक बाब म्हणजेत नाशिक जिल्ह्यातील विंचुरमधील ५ दिवसाच्या बाळाला तर मालेगावमधील चंदनापुरी येथील दहा दिवसांच्या चिमुकलीला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ५४८ रुग्ण हे मालेगाव महापालिका क्षेत्रातील आहे. नाशिक शहरात कोरोनाचे ३९ रुग्ण अद्याप आढळून आले आहे.नाशिक ग्रामिणमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ८५वर पोहचला आहे.नाशिक ग्रामिणमधील नाशिक तालुक्यात ८ येवल्यामध्ये ३१ तर चांदवड-४ सिन्नर-६, निफाड-११, दिंडोरी-६ नांदगाव-३, सटाणा-२ आणि मालेगाव ग्रामिण-१४ अशी जिल्ह्यातील रुग्णसंख्या आहे. जिल्ह्यात बळींचा आकडा वाढून ३३ झाला आहे, यामध्ये ३१ कोरोनाग्रस्त रुग्ण मालेगावमध्ये दगावले आहेत.सुदैवाने सोमवारी नाशिक शहरात कोठेही कोरोनाचा रूग्ण आढळून आला नाही. नाशिकमध्ये अद्याप सातपूर परिसरात १६, सिडको भागात ८, पंचवटी परिसरात ५, नाशिक पुर्व भागातील विविध उपनगरांत ४, नाशिकरोड भागात ३, नाशिक पश्चिममध्ये १ आणि स्थलांतरीत मनपा हद्दीबाहेरील २ अशा ३९ रुग्णांचा समावेश आहे. नाशिक शहरात एका पोलिसासह गर्भवती महिलेचा कोरोनामुळे मृत्यूदेखील झाला आहे. शहरात सोमवारी एकूण ८१ कोरोना संशयित रुग्णांना उपचारार्थ रुग्णालयातील कोरोना कक्षात दाखल करण्यात आले. कोरोना आजारातून पुर्णपणे बरे होऊन शहरातील ९ रुग्ण अद्याप घरी गेले आहेत.एकूणच जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून नाशिक शहरातही विविध उपनगरांमध्ये आता कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून गरजेपुरतेच बाहेर पडावे, तेदेखील योग्य ती काळजी घेऊनच असे आवाहन जिल्हा व आरोग्य प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनाकडूनही केले जात आहे; मात्र नागरिकांमध्ये त्याचे कुठलेही गांभीर्य दिसून येत नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे.नाशिक जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून शहरातील जवळपास सर्वच दुकाने खुली करण्याची मुभा दिली आहे. अर्थचक्र गतिमान करण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असला तरीदेखील त्याचा गैरफायदाच अधिक घेतला जात असल्याचे दिसून येत आहेत.-----शहरातील २७ उपनगरे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून ‘सील’ (कंसात सीलची मुदत)सिडको - (१८ मे पर्यंत)नवश्या गणपती मंदीर परिसर (२२ मे)धोंगडे मळा, ना.रोड (२२ मे)समाजकल्याण कार्यालय, पौर्णिमा बस स्टॉप (२७ मे)संजीवनगर नाशिक (३० मे)चित्रलेखा सोसा. आरटीओ कॉर्नर (६ जून),सावतानगर सिडको (१३ जून)उत्तमनगर सिडको (१३ जून)मालपाणी सॅफ्रॉन, पाथर्डी फाटा (१३ जून)सातपूर कॉलनी ( १३ जून)वृंदावन कॉलनी, जनरल वैद्यनगर (१४ जून)बजरंगवाडी झोपडपट्टी (१६ जून)शांतिनिकेतन चौक ( १७ जून )माणेक्षानगर (१७ जून)पाटीलनगर, सिडको ( १९जून)हनुमान चौक, सिडको (१९ जून)जाधव संकुल, नाशिक ( १९ जून )हिरावाडी, पंचवटी ( १९जून)श्रीकृष्णनगर (१९ जून)इंदिरानगर (२०जून)तारवालानगर (२०जून)अयोध्यानगरी, हिरावाडी (२०जून)तक्षशिला रो-हाऊस परिसर, कोणार्कनगर-२ (२०जून)सागर व्हिलेज, धात्रकफाटा परिसर (२० जून)हरी दर्शन सोसा. धात्रकफाटा (२० जून)सिन्नरफाटा, नाशिकरोड (२१ जून) 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयMalegaonमालेगांव