शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

Independence Day: बासरीच्या नादमाधुर्याने कवी कुसुमाग्रजांचे स्मारक भारावते तेव्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 09:43 IST

Flute program Guruvandana on Independence Day, नाशकात शंभरावर बासरीवादकांचे ‘गुरूवंदना’ कार्यक्रमातून सादरीकरण. स्वातंत्र्यदिनी कुसुमाग्रज स्मारकात संपन्न झाला बासरीचा सोहळा.

नाशिक मंगल, मधुर आणि चैतन्यदायी…!!! अशा भावनांनी ओथंबलेल्या प्रतिक्रिया रसिक श्रोत्यांकडून उमटत असतानाच, ज्याची सर्वांना प्रतीक्षा होती तो क्षण अखेर आलाच, तो म्हणजे ७ ते ७० वर्षांच्या बासरीवादकांनी (Flute playing) एकाच वेळी सादर केलेल्या  ‘वंदे मातरम्’ या गीताचा. निमित्त होते बासरीवादक अनिल कुटे संचालित बासरी वर्गाने नाशिककरांसाठी सादर केलेल्या ‘गुरुवंदना’ कार्यक्रमाचे.  दिनांक १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनी (15th August, Independence Day)  कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा हॉलमध्ये हा सुमधुर कार्यक्रम संपन्न झाला.

सर्व वयोगटातील शंभराहून अधिक बासरीवादकांनी ‘गुरुवंदना’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली बासरीवादनाची कला रसिकांसमोर सादर करत त्यांना  मंत्रमुग्ध केले. यावेळी देशभक्तीपर संगीत, विविध रागांचे सादरीकरण, भक्ती संगीत, भजन, सिनेगीत अशी संगीताची मांदियाळीच बासरीच्या मधुर स्वरांमधून प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. गुरू अनिल कुटे आणि त्यांचे असंख्य शिष्य यांनी एकाच वेळी व्यासपीठावर सादर केलेले बासरीवादन कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.दुपारी ४ वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम रसिकांच्या वन्स मोअर आणि प्रेरणादायी टाळ्यांच्या गजरामुळे तब्बल पाच तास म्हणजेच रात्री ९ पर्यंत उत्तरोत्तर रंगत गेला.  ‘सूर निरागस हो.. या गणेशवंदनेने ‘गुरूवंदना’ कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर ‘यह देश है वीर जवानों का,.. ऐ मेरे वतन के लोगो, यासारख्या देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण झाले. भेटी लागी जीवा, बोले रे पपीहा, पिया बावरी, सत्यम शिवम सुंदरम् या सारख्या भजन आणि विविध रागांवर आधारित सिनेगीतांनी बासरीची रंगत आणखीच वाढविली.कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा होता, तो म्हणजे विविध रागांचे शास्त्रशुद्ध सादरीकरण. यात  आलाप, बंदिश, ताना, मुरकी, खटका, मिंड, गमक अशा विविध शास्त्रीय अंगांसह राग भैरव, राग मेघ, राग चारुकेशी, राग देस, राग भिन्न षडज्, राग जोग, राग बिहाग, राग वृंदावनी सारंग, राग यमन असे एक से बढकर एक मधुर आणि वैशिष्ट्यपूर्ण राग  बासरीवादनातून सादर करण्यात आले. यावेळी तबल्यावर स्वराज पाटील, प्रज्योत आढाव, सिंथेसायझरवर यश येवले, विधान बैरागी आणि ऑक्टोपॅडवर सार्थक बीडकर यांची साथ मिळालीनाशिक शहरात आगामी काळात बासरीचे वैशिष्ट्यपूर्ण सोहळे आयोजित करून रसिकांना बासरीचा निखळ आनंद देण्याचा आणि त्या माध्यमातून नाशिकला ‘फ्लूट सिटी’चा नावलौकिक मिळवून देण्याचा मानस यावेळी श्री. कुटे यांच्या शिष्यवर्गाने बोलून दाखविला. दरम्यान कार्यक्रमासाठी चिन्मय चेतना मिशन आश्रमाचे स्वामी अद्वैतानंद, प्रसिद्ध तबला वादक नितीन पवार यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरयू जाधव यांनी केले. बळीराम महाले यांनी आभार प्रदर्शन केले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNashikनाशिकmusicसंगीत