नाशिक निवडणूक निकाल : मध्य मतदारसंघाचे नेतृत्व पुन्हा भाजपच्या देवयानी फरांदेंकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 04:29 PM2019-10-24T16:29:30+5:302019-10-24T16:34:23+5:30

nashik Vidhansabha Election Results2019 २१व्या फेरीनिहाय कॉँग्रेसच्या प्रतिस्पधी उमेदवार हेमलता पाटील यांना ४४ हजार ५२६ मते मिळाली. तसेच मनसेचे उमेदवार नितीन भोसले यांना २१ हजार ८४१ मते मिळविता आली.

Nashik Election Results: Central constituency again leads to BJP's Devyani Farande, Maharashtra Vidhansabha Election Results 2019 | नाशिक निवडणूक निकाल : मध्य मतदारसंघाचे नेतृत्व पुन्हा भाजपच्या देवयानी फरांदेंकडे

नाशिक निवडणूक निकाल : मध्य मतदारसंघाचे नेतृत्व पुन्हा भाजपच्या देवयानी फरांदेंकडे

googlenewsNext
ठळक मुद्देफरांदे यांना ७२ हजार ५१३ मते पडलीमतदारांनी पुर्णपणे भाजपच्या देवयानी फरांदे यांच्याबाजूने कौल दिलाविजयाची माळ पुन्हा फरांदे यांच्या गळ्यात पडली.

नाशिक : मध्य मतदारसंघात तिरंगी लढत होती; मात्र मतदारांनी पुर्णपणे भाजपच्या देवयानी फरांदे यांच्याबाजूने कौल दिला. त्यामुळे फरांदे यांचा २८ हजार १४१ मतांनी दणदणीत विजय झाला. २१व्या फेरीअखरे फरांदे यांना ७२ हजार ५१३ मते पडली. २१व्या फेरीनिहाय कॉँग्रेसच्या प्रतिस्पधी उमेदवार हेमलता पाटील यांना ४४ हजार ५२६ मते मिळाली. तसेच मनसेचे उमेदवार नितीन भोसले यांना २१ हजार ८४१ मते मिळविता आली.
मध्य मतदारसंघात तीरंगी लढत पहावयास मिळत होती. देवयानी फरांदे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली ती अखेरपर्यंत कायम राहिली. २२व्या फेरीपर्यंत फरांदे यांच्या मतांचा फरक वाढतच गेला. त्यामुळे थेट विजयाची माळ पुन्हा फरांदे यांच्या गळ्यात पडली.
मध्य मतदारसंघाने गेल्या दोन निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली आहे. यामुळे विशिष्ट पक्षाचा प्रभाव नाही असे असताना यंदाही युती, आघाडी आणि मनसे अशी तिरंगी लढत दिसत आहे. त्यामुळे तिन्ही उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती; मात्र या मतदारसंघात खूप अशी काट्याची लढत पहावयास मिळाली नाही.
नाशिक शहरातील मतदारसंघांची पुनर्रचना २००९ मध्ये झाल्यानंतर या मतदारसंघांत सर्वप्रथमच महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने झेंडा रोवला होता, तर त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या देवयानी फरांदे यांनी बाजी मारली होती. त्यामुळे या मतदारसंघात सामाजिक राजकीय गणिते काहीही असो मात्र हा निव्वळ शहरी मतदार हे भावनेवर स्वार होणारे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यंदा भाजपने अनेक इच्छुकांना डावलून देवयानी फरांदे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे कॉँग्रेसने डॉ. हेमलता पाटील यांना उमेदवारी दिली आहे. कॉँग्रेस पक्षात खरे तर नेहमीच उमेदवारीसाठी स्पर्धा असते; परंतु यंदा ऐनवेळी उमेदवारीचा निर्णय घेतला आहे. तर मनसेने नितीन भोसले यांचा नाशिक पश्चिम मतदारसंघ बदलून त्यांना मध्य मध्ये उभे केले आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे संजय साबळे यांच्यासह अन्य उमेदवार रिंगणात आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी नसल्याने पक्षीय उमेदवारांनी स्वतंत्र निवडणूक लढविली होती. यंदा मात्र युती आणि आघाडी झाली आहे; परंतु त्यातील युती आघाडीतील एकजिनसीपणा मात्र दिसत नाही. युतीत जसा शिवसेनेने हात आखडता घेतला तसा आघाडीतदेखील राष्टÑवादीचा एक गट नाराज आहे.
या निवडणुकीत मनसेला समवेत घेण्याचे प्रयत्न फोल ठरल्याने भाजपला पर्याय ठरू शकणाऱ्या आघाडीतदेखील मत विभागणी होणार आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडी प्रस्थापित पक्षांची किती मते घेणार यावर निर्णय होऊ शकतो.

Web Title: Nashik Election Results: Central constituency again leads to BJP's Devyani Farande, Maharashtra Vidhansabha Election Results 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.