शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नाशिक विभागीय आयुक्त महेश झगडे यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 15:35 IST

महेश झगडे यांची मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे वृत्त कळताच काहींनी आनंद व्यक्त केला तर काहींना हळहळ बोलून दाखविली. झगडे यांनी कारभार हाती घेतल्यानंतर शिस्तीचे प्रदर्शन घडविण्याबरोबरच पारदर्शक व गतीमान कारभाराचा आग्रह धरला व

ठळक मुद्देराजाराम माने नवीन आयुक्त : उलट सुलट चर्चासेवानिवृत्तीला अवघे तीन महिने शिल्लक

नाशिक : अवघ्या नऊ महिन्यांपुर्वी नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून रूजू झालेले महेश झगडे यांच्या सेवानिवृत्तीला अवघे तीन महिने शिल्लक असतांना राज्य सरकारने त्यांची तडकाफडकी बदली केली असून, त्यांच्या जागी पुण्याचे महाराष्टÑ ऊर्जा विकास अभिकरणचे (मेडा) महासंचालक आर. आर. माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झगडे यांनी पदभार घेतल्यानंतर ज्या पद्धतीने बेकायदेशीर कामकाजाच्या विरोधात मोहिम उघडली होती, ते पाहता त्यांची अचानक बदलीमागे उलट-सुलट चर्चा होऊ लागली आहे.महेश झगडे यांची मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे वृत्त कळताच काहींनी आनंद व्यक्त केला तर काहींना हळहळ बोलून दाखविली. झगडे यांनी कारभार हाती घेतल्यानंतर शिस्तीचे प्रदर्शन घडविण्याबरोबरच पारदर्शक व गतीमान कारभाराचा आग्रह धरला व त्यातून महसुल तसेच विकास यंत्रणेच्या अधिका-यांच्या बैठका घेवून त्यांना दप्तर दिरंगाई व बेकायदेशीर कामकाजापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. काही नाठाळ अधिका-यांवर त्यांनी कारवाईची शिफारसही केल्याने झगडे यांच्या कामकाजावर अकार्यक्षम अधिकारी नाराज होते. मनमानी कारभार करणारे नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्या बदलीची झगडे यांनीच शिफारस केली होती. जिल्ह्यातील शासकीय जमिनींचे बेकायदेशीर व्यवहार, बांधकाम व्यावसायिकांकडून होणारी फसवणूक, राजकीय हस्तक्षेपास नकार देण्याचे काम झगडे यांनी केल्यामुळेच त्यांची बदली केली गेल्याचे बोलले जात आहे. त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका देवस्थान घोटाळा, भुदान जमीन घोटाळ्यात झगडे यांनी कठोर पावले उचलल्यामुळे देखील झगडे यांची बदली झाल्याची चर्चा होत आहे. झगडे यांनी केलेल्या कारवाईचा तडाखा बसलेल्या काही अधिका-यांनी त्यांची बदली करण्यासाठी प्रयत्न केल्याचेही सांगितले जाते. महेश झगडे यांच्या सेवानिवृत्तीला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक