शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक विभागाचा निकाल 9.84 टक्यांनी घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 14:49 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा अर्थात दहावीचा निकाल शनिवारी (दि.८) जाहीर झाला असून यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत दहावीच्या निकालात तब्बल ९.८४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी ८६.४२ टक्के असलेल्या विभागाचा निकाल यावर्षी ७७.५८ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. शिक्षण मंडळाने प्रश्नपत्रिकांऐवजी कृतीपत्रीकांचा केलेला प्रयोग विद्यार्थ्यांच्या लक्ष न आल्याने निकाला एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचा निरीक्षण शैक्षणिक क्षेत्रातून वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देदहावीचा निकाल जाहीरनाशिक विभागाचा टक्का घसरलाविभागातील १७९ शाळांचा शंभर टक्के निकाल

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा अर्थात दहावीचा निकाल शनिवारी (दि.८) जाहीर झाला असून यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत दहावीच्या निकालात तब्बल ९.८४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी ८६.४२ टक्के असलेल्या विभागाचा निकाल यावर्षी ७७.५८ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. शिक्षण मंडळाने प्रश्नपत्रिकांऐवजी कृतीपत्रीकांचा केलेला प्रयोग विद्यार्थ्यांच्या लक्ष न आल्याने निकाला एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचा निरीक्षण शैक्षणिक क्षेत्रातून वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नाशिकसह, धुळे, नंदुरबार जळगाल या चारही जिल्ह्यांत  ११ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत प्रात्यक्षिक  तर १ ते २२ मार्च या कालवधीत ४३३ परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली होती.  विभागात मराठी , हिंदी, इंग्रजी, उर्दू, सिंधी, गुजराथी,कन्नड व तमीळ या आठ भाषांमध्ये घेण्यात आलेल्या पपरीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विभागातून परीक्षेला प्रविष्ठ एकूण १ लाख ९८ हजार ७५० विद्यार्थ्यांपैकी १ लाख ४१ हजार १९३ म्हणजे ७७.५८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  विभागातील तब्बल १७९ शाळाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. तर ४४५ शालांचा निकाल ९० टक्क्यांहून अधिक लागला आहे. यात प्रामुख्याने इंग्रजी विषयात विभागातील विद्यार्थ्यांची हुश्शारी दिसून आली असून प्रथम भाषा इंग्रजी विषयाचे सर्वाधिक ९६.३३ टक्के  विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्या खोलोखाल विज्ञान ९४.४८ द्वीतीय व तृतीय भाषा मराठी ९३.६२, गणित ९२.५७,  सामाजिक शास्त्र ९२. १२, मराठी प्रथम भाषा ७९.२६ , प्रथम भाषा हिंदी ८४.१८, इंग्रजी द्वतीय वतृतीय भाषा ८३.११, प्रथम भाषा उर्दू ८०.३ टक्के  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. दहावीच्या परीक्षा यावर्षी प्रथमच प्रश्नपत्रीकांऐवजी कृतीपत्रीकांच्या पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. त्यासाठी शिक्षकांचे विशेष प्रशिक्षणही घेण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांकडून सरावासाठी कृतीपत्रीका सोडवूनही घेण्यात आल्या होत्या. परंतु हा प्रयोग विद्यार्थ्यांच्या पूर्णपणे पचणी न पडल्याचे निकालाचा टक्का घसरल्याने दिसून येत आहे. 

यामुळे घसरला निकालाचा टक्का प्रश्नपत्रिके ऐवजी कृतीपत्रिकेची बदललेली परीक्षा आठवीपर्यंत परीक्षा नसल्याने अभ्यासाचा सराव नसणे फिरत्या पथकांची परीक्षेवर करडी नजरबैठे पथकांनी पेपर पूर्ण होईपर्यंत परीक्षेवर नजर ठेवली 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थीSchoolशाळा