शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

नाशिक जिल्ह्यात अखेरच्या दिवशी ६४ उमेदवारांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 20:22 IST

माघार घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने नाशिक पूर्व मतदारसंघातून मनसेचे उमेदवार माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतल्याने राष्टÑवादीचे उमेदवार व माजी आमदार बाळासाहेब सानप यांची भाजपाचे राहुल ढिकले यांच्याशी लढत होणार आहे. या मतदारसंघातून कवाडे गटाचे उमेदवार गणेश उन्हवणे यांनी माघार घेण्यासाठी

ठळक मुद्देपंधरा जागांसाठी १४८ रिंगणात : दुरंगी, बहुरंगी लढतीचे चित्रजिल्ह्यात पंधरा जागांसाठी १४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याच्या सोमवारी अंतिम दिवशी सर्वच मतदारसंघांमध्ये नाट्यमय राजकीय घडामोडी घडून अनेकांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने प्रमुख उमेदवारांमध्येच दुरंगी, तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले तर अनेकांना माघारीसाठी गळ घालूनही उपयोग न झाल्याने बहुरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका दिवसात २१२ उमेदवारांपैकी ६४ उमेदवारांनी माघार घेतल्याने जिल्ह्यात पंधरा जागांसाठी १४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने आता प्रचाराचा धुराळा उडणार आहे.

माघार घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने नाशिक पूर्व मतदारसंघातून मनसेचे उमेदवार माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतल्याने राष्टÑवादीचे उमेदवार व माजी आमदार बाळासाहेब सानप यांची भाजपाचे राहुल ढिकले यांच्याशी लढत होणार आहे. या मतदारसंघातून कवाडे गटाचे उमेदवार गणेश उन्हवणे यांनी माघार घेण्यासाठी राष्टÑवादी व कॉँग्रेसकडून प्रयत्न करण्यात आले, परंतु त्यांनी माघार घेतली नाही. पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे बंडखोर मामा ठाकरे व सुधाकर बडगुजर यांनी माघार घेतली असली तरी, शिवसेनेचे नगरसेवक विलास शिंदे यांनी माघार घेण्यास नकार देत आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे भाजपा उमेदवार सीमा हिरे यांच्यापुढे सेनेच्या बंडखोरीचे आव्हान कायम आहे. याच मतदारसंघातून भाजपाचे बंडखोर डॉ. दिलीप भामरे यांनी माघार घेतली आहे. नाशिक मध्य मतदारसंघातून मात्र एकही माघार होऊ शकली नाही. त्यामुळे या मतदारसंघात बहुरंगी लढत होणार आहे. देवळाली मतदारसंघातून माजी नगरसेवक भाजपाचे कन्हैया साळवे, राष्टÑवादीचे नगरसेवक हरिष भडांगे यांनी माघार घेतली आहे. दिंडोरी मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले व रामदास चारोस्कर यांनी माघार घेतल्याने या मतदारसंघात राष्टÑवादीचे आमदार नरहरी झिरवाळ व सेनेचे उमेदवार भास्कर गावित यांच्यात सरळसरळ लढत होणार आहे असून, येवला मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बंडखोर माणिकराव शिंदे यांनी माघार घेतल्याने राष्टÑवादीचे छगन भुजबळ यांची लढत सेनेचे संभाजी पवार यांच्याशी होणार आहे. इगतपुरी मतदारसंघातून बाळा मेंगाळ याच्यासह तिघांनी माघार घेतली, मात्र शिवसेनेचे इच्छुक माजी आमदार शिवराम झोले यांच्या पत्नीची उमेदवारी कायम असल्याने इगतपुरी मतदारसंघात सेनेच्या उमेदवार माजी आमदार निर्मला गावित यांच्यासमोर आव्हान उभे ठाकले आहे. सिन्नर मतदारसंघातून सीमंतिनी कोकाटे यांनी माघार घेतल्यामुळे सिन्नरमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे व राष्टÑवादीचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्यात सरळ लढत होणार आहे. कळवण मतदारसंघातही माकपाचे आमदार जिवा पांडू गावित, राष्ट्रवादीचे नितीन पवार व सेनेचे मोहन गांगुर्डे यांच्यात तिरंगी लढत अटळ झाली आहे.नांदगाव मतदारसंघातून भाजपाच्या जिल्हा परिषद सभापती मनीषा पवार, पंकज खताळ, सेनेचे माजी आमदार संजय पवार यांनी माघार घेतली असली तरी, पालकमंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक असलेले भाजपाचे रत्नाकर पवार यांनी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्यासमोर भाजपाच्या बंडखोरीचे आव्हान उभे ठाकले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक