राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत नाशिक जिल्हा संघास रौप्यपदक
By Admin | Updated: October 6, 2014 00:10 IST2014-10-05T22:53:09+5:302014-10-06T00:10:15+5:30
राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत नाशिक जिल्हा संघास रौप्यपदक

राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत नाशिक जिल्हा संघास रौप्यपदक
नाशिक : महाराष्ट्र टग आॅफ वॉर असोसिएशन व नागपूर जिल्हा टग आॅफ वॉर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६व्या सबज्युनिअर मुले राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे नाशिक जिल्हा संघाने रौप्यपदक मिळवले. खापरखेडा, नागपूर येथे आयोजित सबज्युनिअर, ज्युनिअर मुले राज्यस्तरीय रस्सीखेच अजिंक्यपद स्पर्धेत नाशिक जिल्हा संघाने अनुक्रमे ५००, ५६० किलोग्रॅम वजनी गटात सहभाग नोंदवला. स्पर्धेत महाराष्ट्रातील ११ जिल्'ांनी सहभाग घेतला होता. नाशिक संघाने ५०० किलो वजनी गटात साखळी स्पर्धेत सर्व संघांचा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्यात नाशिक संघाने सोलापूर संघाचा २-० ने विजय मिळविला. अंतिम सामन्यात नाशिक संघाचा सामना मुंबई संघाशी झाला. या सामन्यात नाशिकच्या संघाने कडवी झुंज दिली; पण अनुभवाच्या जोरावर मुंबई संघाने नाशिक संघाचा २-० ने पराभव केला. अंतिम सामना जिंकत मुंबई संघाने सुवर्णपदक जिंकले व नाशिक संघास रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. नाशिक संघातर्फे कर्णधार प्रशांत जेजूरकर, लुईश भाटिया, भाविन मल्ले, संकेत निरगुडे, नीरज कश्यप, अरबाज सय्यद, वैभव सांगळे, राजकुमार विश्वकर्मा, वैभव जाधव यांनी सहभाग नोंदविला. नाशिक संघाला सुरेखा पाटील, स्वप्नील कर्पे, अतुल जाधव, जयश्री भुसारे, विक्रम पाटील (जाधव), श्रीरंग लेंभे यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)