शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक थंडीची झाली नोंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 01:01 IST

शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे. शहराचे किमान तापमान वेगाने खाली घसरले असून रविवारी (दि. ७) थेट १० अंशांपर्यंत तापमान आल्याने राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढल्याने उत्तर महाराष्ट्रही गारठला आहे. 

ठळक मुद्देकिमान तापमानात घट : १० अंशांपर्यंत घसरला पारा; नाशिककरांना भरली हुडहुडी

नाशिक : शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे. शहराचे किमान तापमान वेगाने खाली घसरले असून रविवारी (दि. ७) थेट १० अंशांपर्यंत तापमान आल्याने राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढल्याने उत्तर महाराष्ट्रही गारठला आहे. काही दिवसांपासून किमान तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली होती. प्रजासत्ताक दिनापासून किमान तापमानात सातत्याने घट होत असून पारा चढ-उतार होत आहे. गुरुवारी (दि.४) तापमान ११.८ अंशांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर पुन्हा कमाल तापमान ३१.३, तर किमान तापमान १३ अंशांपर्यंत वर सरकले; मात्र दोनच दिवसांत अचानक या दोन्ही तापमानात वेगाने घसरण झाली. रविवारी किमान तापमानासह कमाल तापमानदेखील घसरले. ३१ अंशावरून थेट २८.३ अंशांपर्यंत कमाल तापमानाचा पारा खाली आल्याने नाशिककरांना रविवारी दिवसभर वातावरणात गारठा जाणवला. शनिवारी रात्री नऊ वाजेपासूनच थंड वारे वेगाने वाहू लागले हाेते. शनिवारी रात्रीपासूनच थंडीचा कडाका जाणवण्यास सुरुवात झाली. रविवारी सकाळी ८.३० वाजता पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्रात १० अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. राज्यात सर्वात नीचांकी तापमान नाशिकमध्ये थंडीचा कडाका जाणवला.जानेवारीअखेरपासून थंडीचा वाढला कडाका२५ जानेवारी रोजी शहरात १०.४ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते. या संपूर्ण आठवड्यात १२ अंशांच्यापुढे किमान तापमान न गेल्याने थंडीची तीव्रता नाशिककरांना चंगलीच अनुभवायला आली होती. जानेवारी महिना थंडीच्या कडाक्याचा म्हणून ओळखला जात असला तरी फेब्रुवारीत थंडी गायब होईल, असे वाटत असताना पुन्हा थंडीची तीव्रता वाढू लागल्याने नाशिककरांना ऊबदार कपड्यांच्या वापरावर अधिकच भर द्यावा लागत आहे. या शहरांमध्ये थंडीची लाटनाशिकपाठोपाठ गोंदियामध्ये १०.२ तर जळगावात १०.४ आणि पुण्यात १०.८ अंश इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. राज्यात ही शहरे कमालीची गारठली आहेत. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींचा सर्वाधिक परिणाम या शहरांमधील वातावरणावर होताना दिसून येत आहे. पुढील काही दिवस नाशिमध्ये थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकweatherहवामान