शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

कुत्र्याने तोडले मृत अर्भकाचे लचके, नाशिक जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 13:24 IST

एका भटक्या श्वानाने बाळाचा मृतदेह तोंडात धरून लचका तोडत नातेवाईकांचा कारभार चव्हाट्यावर आणल्याने खळबळ उडाली व संतापही व्यक्त झाला.

ठळक मुद्देबाळ कमी वजनाचे असल्याने अत्यवस्थ होते. बाळाला वाचविणे शक्य झाले नाही.बाळाचा मृतदेह अंतीम संस्कारासाठी नातेवाईकांना सोपविला.

नाशिक : पाच दिवसांच्या बाळाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात नाशिक जिल्हा रुग्णालयाने सोपविल्यानंतर नातेवाईकांनी बाळावर अखेरचे अंत्यसंस्कार करण्याऐवजी जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच बेवारसस्थितीत मृतदेह टाकून दिला. परिणामी शनिवारी (दि.२९) त्यांचा हा हलगर्जीपणा माणुसकीला काळीमा फासणारा ठरला. एक भटक्या श्वानाने बाळाचा मृतदेह तोंडात धरून लचका तोडत नातेवाईकांचा कारभार चव्हाट्यावर आणल्याने खळबळ उडाली व संतापही व्यक्त झाला.

इगतपुरी तालुक्यातील धामनगाव येथील एका कुटुंबामधील गर्भवती महिला सोमवारी (दि.२४) नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली. प्रसूतीनंतर नवजात शिशूचे वजन कमी असल्यामुळे नवजात शिशूला अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; मात्र दुसऱ्या दिवशी शिशूचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने कागदपत्रांची पुर्तता करून बाळाचा मृतदेह अंतीम संस्कारासाठी नातेवाईकांना सोपविला. आदिवासी गरीब कुटुंब असलेल्या नातेवाईकांकडे बाळाला घेऊन जाण्यासाठी पैसे नसल्याची बाब पुढे आली असली तरी प्रथमदर्शनी या कु टुंबाने हलगर्जीपणा के ल्याचे उघडकीस आले आहे. कुटुंबातील काही महिला सदस्यांनी बाळाचा दफनविधी करण्याऐवजी जिल्हा रुग्णालयातील उपहारगृहाच्या बाजूला असलेल्या गाजर गवतामध्ये टाकून काढता पाय घेतला. या घटनेला पाच दिवस उलटले. शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास एका भटक्या श्वानाने बाळाचा मृतदेह हुंगला आणि तोंडाने लचका तोडत दाताखाली दाबून परिसरातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी श्वानाच्या तोंडातून बाळाचा मृतदेह हिसकविण्याचा प्रयत्न केला; मात्र श्वान मृतदेह सोडत नसल्याचे पाहून काही नागरिकांनी श्वानाला लाठ्या-काठ्यांनी, दगडांनी घाबरविले, गर्दी बघून श्वानाने मृतदेह जमिनीवर टाकला आणि पळ काढला. तत्काळ जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचा-यांनी बाळाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेतला. दरम्यान, सरकारवाडा पोलिसांनी पंचनामा करत नोंद केली.माता अत्यवस्थ; अतिदक्षता विभागात उपचार

इगतपुरी ग्रामिण रुग्णालयात धामनगावातील या कुटुंबातील गर्भवती मातेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते; मात्र मातेला झटके येऊ लागल्याने त्या रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सिझेरियन प्रसूतीनंतर बाळाचा जन्म झाला; मात्र बाळ कमी वजनाचे असल्याने अत्यवस्थ होते. अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले; मात्र बाळाला वाचविणे शक्य झाले नाही. तसेच मातेचेही प्रकृती गंभीर असल्याने येथील अतिदक्षता विभागात त्या मातेवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिक