शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

नाशिक जिल्हा न्यायालयाने आतापर्यंत   १८ आरोपींना  सुनावली फाशीची शिक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:24 IST

निर्घृण गुन्ह्यासाठी दिली जाणारी सर्वोच्च शिक्षा म्हणजे मृत्युदंड आणि मृत्युदंडाचा सर्वमान्य प्रकार म्हणून जागतिक पातळीवर फाशीची शिक्षा दिली जाते़ नाशिक जिल्हा न्यायालयाने १९७५ पासून गत ४३ वर्षांच्या कालावधीत सहा दुर्मीळ व निर्र्घृण खटल्यातील १८ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे़

विजय मोरे ।नाशिक : निर्घृण गुन्ह्यासाठी दिली जाणारी सर्वोच्च शिक्षा म्हणजे मृत्युदंड आणि मृत्युदंडाचा सर्वमान्य प्रकार म्हणून जागतिक पातळीवर फाशीची शिक्षा दिली जाते़ नाशिक जिल्हा न्यायालयाने १९७५ पासून गत ४३ वर्षांच्या कालावधीत सहा दुर्मीळ व निर्र्घृण खटल्यातील १८ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे़  अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासे तालुक्यातील सोनई येथील सवर्ण जातीतील मुलीसोबत असलेल्या प्रेमप्रकरणावरून मुलीच्या कुटुंबीयांनी सचिन घारू, राहुल कंडारे, संदीप थनवर या तिघांचा निर्घृण खून करणारे आरोपी रमेश दरंदले, प्रकाश दरंदले, संदीप कुºहे, अशोक नवगिरे, पोपट दरंदले, गणेश दरंदले या सहा जणांना शनिवारी (दि़ २०) जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्रकुमार वैष्णव यांनी फाशीची शिक्षा सुनावली.  नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना १८८५ साली झाली़ एम़ बी़ बकेर हे जिल्हा न्यायालयाचे प्रथम प्रधान न्यायाधीश होते़  जिल्हा व सत्र न्यायालयाने १९७५ पासून नाशिक जिल्ह्यातील पाच, तर अहमदनगर जिल्ह्यातील एक अशा सहा गुन्ह्यांतील १८ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे़ या गुन्ह्यामध्ये बेलतगव्हाण येथील सातोटे हत्याकांड, मालेगाव तालुक्यातील पाटील हत्याकांड तसेच अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून खून करणाºया पप्पू साळवे या खटल्यांचा समावेश आहे़ अंधश्रद्धा अर्थात बुवाबाजीतून एका विवाहितेला रात्रभर जबर मारहाण करून तिचा खून केल्याची घटनाही नाशिक शहरातील रविवार पेठेत सोहनी कुटुंबात घडली़  पती व नणंद यांनी केलेल्या या निर्घृण खुनाबाबत या दोघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे, तर नाशिक जिल्ह्यातील पहिला आॅनर किलिंग खटल्याचा गतवर्षी निकाल लागून त्यामध्ये एकनाथ कुंभारकर या पित्यास न्यायाधीश घोडके यांनी फाशीची शिक्षा सुनावली़  यानंतर २०१३च्या नगरमधील बहुचर्चित सोनई हत्याकांडातील सहा आरोपींना फाशीची शिक्षा  सुनावली. फाशीची शिक्षा  ही दुर्मिळातील दुर्मीळ खटल्यातच दिली जाते, याचे प्रमुख कारण  म्हणजे गुन्हा करणाºयांना उचित शिक्षा व्हावी तसेच त्या मार्गाने जाऊ इच्छिणाºया अन्य गुन्हेगारांना धडा मिळावा.  अत्यंत दुर्मीळ खटल्यांमध्येच न्यायालय फाशीची शिक्षा ठोठावते़ आरोपीला कडक शिक्षा झाली नाही तर गुन्हेगारांची हिंमत वाढेल व कायद्याचा धाक कमी होईल़ तसेच अन्याय झालेल्या व्यक्तींचा न्यायव्यवस्थेवरील विश्वासही कमी होईल़ फाशीच्या शिक्षा सुनावलेले खटले हे दुर्मीळ असेच आहेत़ न्यायालयाच्या या निर्णयामुळे समाजातही एक चांगला संदेश गेला असून, फिर्यादींना न्याय मिळाला आहे, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. अत्यंत दुर्मिळ खटल्यांमध्येच न्यायालय फाशीची शिक्षा ठोठावते़ आरोपीला कडक शिक्षा झाली नाही तर गुन्हेगारांची हिंमत वाढेल व कायद्याचा धाक कमी होईल़ तसेच अन्याय झालेल्या व्यक्तींचा न्यायव्यवस्थेवरील विश्वासही कमी होईल़ न्यायालयाने फाशीच्या शिक्षा सुनावलेले खटले हे दुर्मिळ असेच आहेत़ न्यायालयाच्या या निर्णयामुळे समाजातही एक चांगला संदेश गेला असून, फिर्यादींना न्याय मिळाला आहे़  - उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील १४ जानेवारी १९७५ नाशिक नगरपालिका शाळेत शिक्षक असलेली व रविवार पेठेत राहणारी विजया सोहनी या महिलेच्या अंगात देवाची हवा येते, असा समज होता़ तिची भावजय शुभांगी हिने मुलगी जान्हवीसाठी माहेरून लाकडी साप व कापडी हत्ती हा खेळण्यासाठी आणला होता़; मात्र हे सर्व चेटूक करण्यासाठी आणल्याचा आरोप करून विजया व तिचा भाऊ अर्थात शुभांगीचा पती अशोक लक्ष्मण सोहनी यांनी १४ जानेवारी १९७५ रोजी रात्री तिला बेदम व निर्घृणपणे मारहाण केली त्यात तिचा मृत्यू झाला़ मात्र त्यांचा हा बनाव उघड झाला़ पोलीस तपास व उपलब्ध पुरावे या आधारे या दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली़ या खटल्यात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड़ बाबूराव ठाकरे यांनी काम पाहिले होते़ २४ आॅक्टोबर १९९६ मालेगावचे कृषी अधिकारी तथा सोयगाव येथील सुपडू धवल खैरनार (पाटील) त्यांची पत्नी पुष्पा, आई केसरबाई, मुलगा राकेश ऊर्फ पप्पू, मुली पूनम व रूपाली अशा सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती़ सुपडू पाटील यांचा भाऊ आरोपी प्रकाश १) प्रकाश धवल खैरनार (पाटील) व त्यांचा मुलगा संदीप ऊर्फ बबलू प्रकाश खैरनार पाटील या दोघांनी २४ आॅक्टोबर १९९६ रोजी हे हत्याकांड केले़ शेतजमिनीच्या वादातून या सहा जणांची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते़ या दोघांनाही जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती़ या खटल्यात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड़ एम़ टी़ क्यू. सय्यद यांनी काम केले होते़ ५ जून २००३ नाशिकरोड परिसरातील बेलतगव्हाण शिवारातील विष्णू हगवणे यांच्या शेतातील पेरूची बाग सांभाळणारे सातोटे कुटुंबीयातील आई व मुलीवर बलात्कार करून पाच जणांची निर्घृणपणे हत्या करणारे आरोपी अंकुश शिंदे, राजा शिंदे, अंबादास शिंदे, राजू शिंदे, बापू शिंदे व सूर्या ऊर्फ सुरेश शिंदे या सहा आरोपींना जिल्हा न्यायालयाने १२ जून २००६ रोजी फाशीची शिक्षा सुनावली़ ५ जून २००३ रोजी हे भीषण हत्याकांड झाले होते. विशेष म्हणजे या घटनेत आरोपींनी लहान मुलांना क्रूरपणे मारहाण केली होती़ या खटल्यात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उषा केजरीवाल व अजय मिसर यांनी काम केले़ २८ नोव्हेंबर २००८ सिन्नर येथील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिचा खून करून मृतदेह विहिरीत फेकून पुरावा नष्ट केल्याच्या आरोपातून सुनील सुरेश उर्फ पप्पू साळवे (३२) यास नाशिकचे तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आर. महाजन यांनी २८ नोव्हेंबर २००८ रोजी फाशीची शिक्षा सुनावली. मूळचा मराठवाड्यातील असलेला साळवे याने केवळ सिन्नरच नाही, तर नाशिकरोड, अंबड, शिर्डी या ठिकाणच्या चार अल्पवयीन मुलींचे अपहरण, लैंगिक अत्याचार करून खून केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले होते़ २८ जून २०१३ आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून नऊ महिन्यांच्या गर्भवती लेक प्रमिला दीपक कांबळे (२३) हिचा गळा आवळून खून करणारा करणारा एकनाथ किसन कुंभारकर (४४) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सूचित्रा घोडके यांनी सोमवारी (दि़ १९) फाशीची शिक्षा सुनावली. २८ जून २०१३ रोजी तिचा गळा आवळून खून केला़ नाशिक शहरातील हा पहिला आॅनर किलिंगचा प्रकार समोर आला होता़ या खटल्यात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड़ पौर्णिमा नाईक यांनी काम केले़ १ जानेवारी २०१३ नेवासाफाटा येथील घाडगे-पाटील बी़एड. महाविद्यालयातील एका मुलीचे सफाई कामगार म्हणून तात्पुरत्या स्वरूपात कामास असलेल्या सचिन घारू या मुलावर प्रेम होते. या प्रेमप्रकरणातून १ जानेवारी २०१३ रोजी सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे मुलीच्या कुटुंबीयांनी कट रचून सचिन घारू, संदीप धनवार व राहुल कंडारे या तिघा तरुणांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. न्यायाधीश वैष्णव यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात विशेष सरकारी वकील अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले़

टॅग्स :Crimeगुन्हा