शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
5
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
6
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
7
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
8
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
9
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
10
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
11
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
12
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
13
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
14
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
15
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
16
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
17
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
18
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
19
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
20
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी

अपशकुनी खुर्ची बदलून नाशिक जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षांनी स्वीकारली सुत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 15:39 IST

रिझर्व्ह बॅँकेच्या सुचनेनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेवर २९ डिसेंबर रोजी बरखास्तीची कारवाईला सामोरे जावे लागले होते. संचालकांनी या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले होते. त्याची सुनावणी सोमवारी होऊन न्यायालयाने सहकार खात्याच्या बॅँक बरखास्तीच्या कारवाईला स्थगिती देत

ठळक मुद्देसंचालकांनी केले बॅँकेच्या कामकाजाला सुरूवातजिल्हा बॅँक : वसुलीसाठी कठोर पावले उचलणार

नाशिक : उच्च न्यायालयाने दिलासा दिलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्षांसह संचालकांनी गुरूवारच्या मुहूर्तावर बॅँकेच्या कामकाजाला पुन्हा सुरूवात केली. बॅँकेचे अध्यक्ष म्हणून सुत्रे ताब्यात घेतल्यानंतर अवघ्या सात दिवसातच बरखास्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागल्याने अध्यक्षपदाची खुर्चीला अपशकूणी ठरवून अध्यक्ष केदा अहेर यांनी यावेळी जुनी खुर्ची दालनाबाहेर काढून नवीन खुर्चीवर बसत नव्या ‘ईनिंग’ला प्रारंभ केला.रिझर्व्ह बॅँकेच्या सुचनेनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेवर २९ डिसेंबर रोजी बरखास्तीची कारवाईला सामोरे जावे लागले होते. संचालकांनी या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेत आव्हान दिले होते. त्याची सुनावणी सोमवारी होऊन न्यायालयाने सहकार खात्याच्या बॅँक बरखास्तीच्या कारवाईला स्थगिती देत संचालकांना बॅँकेचे नियमीत कामकाजात सहभागी होण्याची मुभा दिली होती. गेल्या दोन दिवसांपासून न्यायालयाच्या आदेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या संचालकांना बुधवारी सायंकाळी आदेशाची प्रत मिळाल्यावर गुरूवारी दुपारी दोन वाजता अध्यक्ष केदा अहेर, उपाध्यक्ष सुहास कांदे यांच्यासह संचालकांनी जिल्हा बॅँकेत प्रवेश केला. यावेळी बॅँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल यांच्याकडे न्यायालयाच्या आदेशाची प्रत सादर करून केदा अहेर यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली. यावेळी आमदार सीमा हिरे, डॉ. शोभा बच्छाव, शिरीष कोतवाल, परवेज कोकणी, दिलीप बनकर, नरेंद्र दराडे, संदीप गुळवे, किशोर दराडे, धनंजय पवार हे संचालक उपस्थित होते. संचालकांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच बॅँकेचे शाखाधिकारी, खातेप्रमुखांची बैठकही घेण्यात आली व त्यात बॅँकेच्या वसुलीसाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले.

 

टॅग्स :bankबँकNashikनाशिक