शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नाशिक जिल्ह्यात ३५ टीईटी अनुत्तीर्ण शिक्षक ;१५ जणांचे वेतन रोखले

By नामदेव भोर | Updated: February 4, 2020 21:48 IST

जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील खासगी अनुदानित शाळांध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर तब्बल ५० शिक्षकांची नियुक्ती झाली असल्याची माहिती वेतन विभागाने केलेल्या पडताळणीत समोर आले असून, यातील तब्बल ३५ शिक्षक अनुत्तीर्ण असल्याची गंभीरबाब समोर आली आहे.

ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यात 35 टीईटी अनुत्तीर्ण शिक्षक अल्पसंसख्यांक शाळांचे 18 तर अनुकंपातील दोन शिक्षकांचा समावेश टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या 15 शिक्षकांचे वेतन रोखले

नामदेव भोर, नाशिक : जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील खासगी अनुदानित शाळांध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर तब्बल ५० शिक्षकांची नियुक्ती झाली असल्याची माहिती वेतन विभागाने केलेल्या पडताळणीत समोर आले असून, यातील तब्बल ३५ शिक्षक अनुत्तीर्ण असल्याची गंभीरबाब समोर आली आहे. मात्र. यातील १८ शिक्षक अल्पसंख्याक शाळांमध्ये कार्यरत असल्याने बचावले असून, अन्य दोन शिक्षक अनुकंपातत्त्वावर असल्याने त्यांचे वेतन नियमितपणे सुरू राहणार आहे, तर १५ टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांचे जानेवारी महिन्याचे वेतन रोखण्यात आले आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २००९ मधील कलम २३ नुसार शिक्षकांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीईटी) राज्यातील शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी पहिली ते आठवीच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा, अर्थात टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक केलेले आहे. त्यासाठी राज्य सरकारने १३ डिसेंबर २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी तीन संधी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यापूर्वीच २०१५ मध्ये केंद्र सरकारने टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी चार वर्षांची मुदतवाढ दिल्याने राज्य सरकारने दिलेली मुदतवाढ केंद्र सरकारच्या धोरणाशी विसंगत असल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्य सरकारने निर्णयात बदल करून नवीन परिपत्रक जाहीर करीत ३० मार्च २०१९ पर्यंत जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण होणार नाहीत त्यांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील टीईटी अनुत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची माहिती घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या वेतन पथकाने जानेवारी महिन्याचे वेतन काढण्यापूर्वी १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्ती झालेल्या सर्व शिक्षकांची माहिती मागविली होती. त्यातून जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांमध्ये सुमारे ५० शिक्षकांची नियुक्ती झाल्याचे समोर आले असून, १५ शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिलेल्या मुदतीत उत्तीर्ण केल्याचे स्पष्ट झाले, तर अन्य ३५ शिक्षक टीईटी अनुत्तीर्ण असतानाही सेवेत कार्यरत आहेत. यातील १८ शिक्षक हे अल्पसंख्याक शाळांमध्ये कार्यरत आहेत, तर अन्य दोन शिक्षक अनुकंपातत्त्वावर रुजू झाले आहेत. अशा शिक्षकांना  शासन निर्णयातून वगळले असल्याने त्यांचे वेतन कायम ठेवण्यात आले आहे, तर उर्वरित १५ शिक्षकांचे वेतन रोखण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वेतन पथकाने दिली आहे. 

पडळताळणीत आढळलेली माहिती अशी एकूण नियुक्त शिक्षक -५०टीईटी उत्तीर्ण शिक्षक -१५अल्पसंख्याक शाळेतील शिक्षक -१८अनुकंपातत्त्वावरील शिक्षक -०२वेतन रोखण्यात आलेले शिक्षक-१५

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकTeacherशिक्षक