गणेशोत्सवासाठी नाशिक ढोलला पसंती

By Admin | Updated: September 8, 2016 01:26 IST2016-09-08T01:25:10+5:302016-09-08T01:26:02+5:30

ढोल पथके रवाना : मुंबई, ठाणे सार्वजनिक गणेश मंडळांकडून अधिक मागणी

Nashik Dhol is preferred for Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी नाशिक ढोलला पसंती

गणेशोत्सवासाठी नाशिक ढोलला पसंती

नाशिकरोड : मुंबई-ठाणे परिसरात दीड, तीन, पाच, सात दिवसांच्या घरगुती गणपतीचेदेखील मोठ्या प्रमाणात ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन करण्यात येते. ढोल-ताशांच्या क्षेत्रात मुंबईकरांना पडलेली ‘नाशिक-ढोल’ची भुरळ आजही कायम असल्याने नाशिकमधील अनेक ढोल-ताशाचालक आपल्या वाद्यवृंदासह रवाना झाले आहे.
डिजिटल व अत्याधुनिक युगात डीजेची धमाल असली तरी ढोल-ताशांने आजही आपले वेगळेपण व महत्त्व टिकवून ठेवले आहे. ढोल-ताशांच्या क्षेत्रात ‘नाशिक-ढोल’चे वेगळेपण सर्वांनाच मान्य करायला लागते. डीजेच्या काळात बॅँजो पार्टी नावापुरती राहिली. मात्र नाशिकच्या ढोलची वेगवेगळी ताल, ताशाच्या तालावर वाजणारा ढोल, झांजची साथ यावर लहान बाल-गोपाळांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना ठेका धरण्याची इच्छा होते.
विविध मंडळांनी आपले ढोल पथक बनविले असून, त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक, युवक, महिला, युवती, मुले ढोल-ताशा शिकत सामील होतात. एकसारखा गणवेश, ढोल-ताशा वाजविण्याच्या विविध पद्धती, महिलांचा सहभाग, मऱ्हाठमोळापणा यामुळे दिवसेंदिवस ढोल पथक व त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र मुंबई-ठाण्यात आजही नाशिकमधील जुने ढोल-ताशा पथक यांची मागणी तशीच कायम आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक ढोल-ताशा पथके गणेशोत्सवात दहा दिवस मुंबई-ठाण्यातच राहतात. (प्रतिनिधी)

Web Title: Nashik Dhol is preferred for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.