‘नाशिकदर्शन’ बसचा ‘तारांगण’ला थांबा
By Admin | Updated: January 19, 2016 23:51 IST2016-01-19T23:17:23+5:302016-01-19T23:51:38+5:30
‘नाशिकदर्शन’ बसचा ‘तारांगण’ला थांबा

‘नाशिकदर्शन’ बसचा ‘तारांगण’ला थांबा
नाशिक : महापालिकेच्या तारांगण प्रकल्पाला ऊर्जितावस्थेत आणल्यानंतर तो अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी प्रयत्न केले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून ‘तारांगण’ला नाशिकदर्शन बसचा थांबा देण्याचे एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी मान्य केले आहे. त्यामुळे पर्यटकांनाही तारांगणमधील ‘शो’चा आनंद लुटता येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी दिली.
दुर्लक्षित राहिलेल्या तारांगणचे पुनरुज्जीवन अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी केले. तारांगण प्रकल्पाकडे प्रेक्षकांची पावले वळावीत यासाठी खगोल आणि विज्ञानविषयक उपक्रम राबविणे सुरूकेले. दरम्यान, तारांगण प्रकल्पाला बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनीही भेट द्यावी यासाठी सोनवणे प्रयत्नशील होते. तारांगण येथे एसटी महामंडळाची ‘नाशिक दर्शन’ची बस थांबावी यासाठी त्यांनी एसटीच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार, जोशी यांनी नाशिक दर्शन बसचा तारांगणला थांबा मंजूर केला आहे. त्यामुळे बाहेरील पर्यटकांनाही तारांगणचा विशेष शो पाहता येणार आहे. दुपारी १२.३० वाजता थांबाविभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी थांबा मान्य केल्यानंतर नाशिक दर्शनची बस तारांगण येथे दुपारी १२.३० वाजता येणार आहे. सदर बसमधील ज्या प्रवाशांना तारांगणचा शो पाहायचा असेल ते शोचा आनंद लुटतील. त्यानंतरच बस पुढे मार्गस्थ होणार आहे. या शोमध्ये वेगवेगळ्या फिल्म दाखविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगण्यात आले.