शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या वेठबिगार दाम्पत्याची गोठ्यातून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 16:12 IST

नगर जिल्'ात वास्तव्य : श्रमजीवी संघटनेच्या प्रयत्नांना यश, गुन्हा दाखल

ठळक मुद्देगुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी तब्बल आठ तास लावले

समाधान कडवे, वैतरणानगर : ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगडनंतर आता श्रमजीवी संघटनेच्या वेठबिगार मुक्तीची मोहीम अहमदनगर जिल्'ात धडकली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मधील साकुर फाटा येथील कातकरी समाजाच्या दाम्पत्याची नगर जिल्ह्यातील कोतूळ येथील मालकाच्या गुलामीच्या पाशातून मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित मालकावर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेण्यास पोलिसांनी तब्बल आठ तास घेतले परंतु, श्रमजीवी संघटनेच्या चिवटपणापुढे पोलिसांना अखेर गुन्हा दाखल करणे भाग पडले.अकोले येथील दत्तात्रेय आणि सुखदेव गीते यांनी भारती आणि किरण जाधव यांना पाच हजार बयाना देऊन तबेल्याच्या कामासाठी ठेवले होते. काही पैसे देऊन त्यांच्याकडून १५ ते १८ तास काम करुन घेतले जात होते. दिवाळीच्या सणासाठी हे दाम्पत्य आपल्या घरी आले परंतु, त्यांना परतण्यास विलंब झाल्याने मालकाकडून धमक्या दिल्या गेल्या. त्यातच अंगावर दिलेले पैसे परत कर त नाही तोपर्यंत किरणला बंधक बनवण्यात आल्याचा आरोप या दाम्पत्याने केला. सदर घटना श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना कळली तेव्हा त्यांनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित ,सरचिटणीस विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नगर गाठले आणि या मजुरांची मुक्तता करत मालकावर गुन्हा दाखल करण्यात यश मिळवले. अकोले तालुक्यातील कोतूळ या ठिकाणी एका गाईच्या गोठ्यात या दाम्पत्याला काम देण्यात आले होते. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदर दाम्पत्यास घेऊन पोलिस स्टेशन गाठले परंतु, गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी तब्बल आठ तास लावले. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतल्यानंतर अखेर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे श्रमजीवीचे भगवान मधे यांनी सांगितले.सीसीटीव्हीवरुन नजरसदर दाम्पत्यास गाईच्या गोठ्यात काम देण्यात आले होते. सदर गोठ्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यादद्वारे त्यांच्यावर नजर ठेवली जायची, असे तक्रारीत म्हटले आहे. गोठ्यात एकूण ३८ गाई होत्या. त्यांना चुकून चारा न टाकल्यास संबंधित मालकाकडून सीसीटीव्हीदद्वारे पाहून दाम्पत्याला शिवीगाळ करत असे. शिवाय, आजारी असतानाही काम करुन घेतले जात असल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी