शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक निधीत ‘असाही’ झोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 16:04 IST

जिल्हा दर सूचीचा फटका : पूर्ण निधी मिळतच नसल्याचा दावा

ठळक मुद्देमहापौरांनी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्रत्येक पालिका सदस्यांना प्रत्येकी ७५ लाख रुपयांचा निधी दिलेला आहे डी.एस.आर. रेट जास्त असल्याने प्राकलन जास्त रकमेचे तयार होऊन त्याचा फटका पालिका सदस्यांना

नाशिक - महापौरांनी चालू आर्थिक वर्षात प्रत्येक नगरसेवकाला प्रभागाच्या विकासासाठी ७५ लाख रुपयांचा निधी बहाल केला असला तरी, प्रत्यक्ष कामांची प्राकलने तयार करताना दरसूचीचा फटका बसून मिळालेल्या निधीत कपात होत असल्याचा दावा, शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केला आहे. ज्या नगरसेवकांचा निधी शिल्लक राहिला असेल, त्यांना तो पुन्हा वापरायास मिळेलच असे नाही. त्यामुळे नगरसेवक निधीचा हा झोल येत्या महासभेत चर्चेला येण्याची शक्यता आहे.महापौरांनी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्रत्येक पालिका सदस्यांना प्रत्येकी ७५ लाख रुपयांचा निधी दिलेला आहे. कायद्याच्या भाषेत हा विकास निधी असला तरी त्याला नगरसेवक निधी म्हणूनच संबोधिले जाते. सदर निधीतून अनेक कामे नगरसेवकांनी सुचविलेली आहेत. परंतु, तांत्रिक बाबींमुळे हा ७५ लाखांचा संपूर्ण निधी सदस्यांना मिळतच नसल्याचा दावा शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी केला आहे. तिदमे यांनी म्हटले आहे, निधी वापरण्यासाठी नगरसेवकांकडून प्राकलन रकमेएवढ्या रकमेचे पत्र घेण्यात येते. प्राकलन तयार करताना डी.एस.आर.रेटचा (जिल्हा दर सूची) संदर्भ घेण्यात येतो. मुळातच हा डी.एस.आर. हा स्थानिक प्रचलित दरांपेक्षा जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे बव्हंशी ठेकेदार २५ ते ४० टक्क्यापर्यंत कमी दराने निविदा भरताना दिसतात. परंतु, नगरसेवकांनी प्राकलन रकमेनुसार दिलेला निधी संपूर्ण खर्च होत नाही. सदर काम ठेकेदाराने कमी दरात घेतले म्हणून उर्वरित रक्कम पुन्हा नगरसेवक निधीत समाविष्ट होत नाही. पालिका सदस्याचा निधी प्राकलन दरानुसारच त्याच्या मिळालेल्या निधीतून कपात होतो. डी.एस.आर. रेट जास्त असल्याने प्राकलन जास्त रकमेचे तयार होऊन त्याचा फटका पालिका सदस्यांना बसत आहे. पालिकेतील १२२ सदस्यांचा नगरसेवक निधी लक्षात घेतल्यास ९१ कोटी ५० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, डीएसआर रेट अधिक असल्याने प्राकलन जादा दराने बनते आणि नगरसेवक निधीचे पत्रही त्याच नुसार घेतले जाते. मात्र, ठेकेदार काम घेताना २५ ते ४० टक्के पर्यंत कमी दराने निविदा भरतात. सरासरी ३० टक्के म्हटले तरी तरतूद केलेल्या एकूण रकमेतून २५ ते ३० कोटी रुपये खर्च होतच नाही, असा दावाही तिदमे यांनी केला आहे.शिल्लक निधी वापरण्यास मिळावाअंदाजपत्रकातील तरतुरीचा पूर्ण लाभ नगरसेवक निधीला लाभत नाही. त्यामुळे कार्यादेश झाल्यानंतर उर्वरित शिल्लक निधी पुन्हा संबंधित पालिका सदस्यांना वापरण्यास मिळाला पाहिजे. डी.एस.आर. रेट अधिक असल्याने पालिकेच्या अंदाजपत्रकातील आकडेवारी फुगत असल्याचे लक्षात येते.- प्रवीण तिदमे, नगरसेवक, शिवसेना

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका