शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नाशिक शहरात चक्क अवघे ४ हजार २९२ भाडेकरू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 18:23 IST

शहरातील तेरा पोलीस ठाण्यांपैकी सर्वाधिक भाडेकरू इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. इंदिरानगरमध्ये एकूण ८३८ भाडेकरूंची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. इंदिरानगरच्या हद्दीत असलेल्या पाथर्डी, पांडवनगरी, वडाळागाव, राजीवनगर आदि भागात मोठ्या संख्येने घरे खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असून भाडेतत्वावर घरे घेणा र्‍याची संख्या अधिक

ठळक मुद्दे इंदिरानगरमध्ये एकूण ८३८ भाडेकरूंची पोलीस ठाण्यात नोंद जास्त भाडेकरुंची संख्या अंबड व सातपूर भागात असण्याची शक्यता भाडेकरूंचा प्रश्न व शहराच्या सुरक्षाव्यवस्थेला उद्भवणारा धोका याविषयीचा प्रश्न चव्हाट्यावर

नाशिक : शहरातील तेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत भाडेकरुंची नोंद काही प्रमाणात करण्यात आली असून जानेवारीपासून तर अद्याप शहर व उपनगरीय भागात एकूण ४ हजार २९२ भाडेकरु अधिकृतपणे वास्तव्यास असल्याचे पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. सर्वात कमी भाडेकरू देवळाली कॅम्प परिसरात असून सर्वाधिक भाडेकरु इंदिरानगर परिसरात आहे.शहरातील तेरा पोलीस ठाण्यांपैकी सर्वाधिक भाडेकरू इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. इंदिरानगरमध्ये एकूण ८३८ भाडेकरूंची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. इंदिरानगरच्या हद्दीत असलेल्या पाथर्डी, पांडवनगरी, वडाळागाव, राजीवनगर आदि भागात मोठ्या संख्येने घरे खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असून भाडेतत्वावर घरे घेणा र्‍याची संख्या अधिक आहेत. इंदिरानगरमध्ये संख्या अधिक असली तरी त्याच्या तुलनेत जास्त भाडेकरुंची संख्या अंबड व सातपूर भागात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरात औद्योगिक वसाहत असल्यामुळे कामगार वर्ग मोठ्या संख्येने येथे वास्तव्यास असून परप्रांतीय लोकांचीदेखील संख्या अधिक आहे. या भागातील पोलीस ठाण्यांच्या अधिकाºयांनीदेखील परिसरातील भाडेकरुंची माहिती मागवून त्याची नोंद करुन घेण्यासाठी मोहिम सुरू करण्याची गरज आहे.

...तर भाडेतत्वाचा व्यवहार ‘धोक्याचा’काही दिवसांपूर्वी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डी फाटा परिसरातील ‘पार्वती’च्या सदनिकेत अहमदनगरचे कुख्यात गुंड शार्पशूटर वास्तव्यास असल्याचे पोलिसांनी उघड केले. तब्बल १८ महिन्यांपासून त्यांचे या भागात वास्तव्य होते, असे पोलीस तपासात समोर आले आहे. या गुंडांना ज्या घरमालकाने भाडेतत्त्वावर घर दिले त्याने कुठलीही माहिती यासंदर्भात पोलिसांना दिलेली नव्हती. यामुळे पोलिसांनी त्याच्यासह एजंटवरही गुन्हा दाखल केला आहे. एकूणच या घटनेपासून पुन्हा शहरात अनधिकृतपणे वास्तव्य करणार्‍या भाडेकरूंचा प्रश्न व शहराच्या सुरक्षाव्यवस्थेला उद्भवणारा धोका याविषयीचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

नोंदणी सुलभतेच्या दिशेने पाऊलपोलीस प्रशासनानेदेखील सदर प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन भाडेतत्त्वाची पोलीस ठाण्यातील नोंदणीप्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकले आहे. भाडेतत्त्वाच्या मुद्रांक करारपत्राच्या नोंदणीकरिता असलेली अट शिथिल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी दिली आहे. करारपत्राचा खर्च करण्याची जबाबदारी घरमालकाची की भाडेकरूंची यावरून होणारा वाद व त्यामुळे पोलिसांकडे नोंदणीबाबत केली जाणारी टाळाटाळ लक्षात घेता सिंगल यांनी सदर अट शिथिल करून सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकार्‍याना तशी लेखी सूचनाही काढली आहे. यामुळे निश्चितच नोंदणीच्या आकडेवारीमध्ये नजीकच्या काळात वाढ हाईल, असा विश्वास पोलिसांना आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrimeगुन्हा