शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरातील दर गुरूवारची पाणी कपात रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 19:40 IST

नाशिक- गंगापूर धरणात पाणी साठा वाढल्याने नाशिक महापालिकेने पाणी कपात अंशता रद्द केली आहे. त्यानुसार दर गुरूवारी संपुर्ण शहरात पाणी पुरवठा खंडीत करून कोरडा दिवस पाळला जात होता. तो रद्द करण्यात आला आहे. मात्र संपुर्ण शहरात एकवेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहापालिकेने घेतला निर्णयगंगापूर धरणात ५३ टक्के साठासंपुर्ण शहरात मात्र एक वेळ पाणी पुरवठा कायम

नाशिक-गंगापूर धरणातपाणी साठा वाढल्याने नाशिक महापालिकेने पाणी कपात अंशता रद्द केली आहे. त्यानुसार दर गुरूवारी संपुर्ण शहरात पाणी पुरवठा खंडीत करून कोरडा दिवस पाळला जात होता. तो रद्द करण्यात आला आहे. मात्र संपुर्ण शहरात एकवेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.

महापालिकेत सोमवारी (दि.१५) आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दालनात आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, महापौर रंजना भानस यांच्याबरोबरच गटनेते आणि अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.शहराला पाणी पुरवठा करणा-या गंगापूर धरणात पुरेसा साठा नाही त्यातच धरणातील जलपातळी खालावली आणि निम्न पातळीवर पाणी घेणे शक्य नाही. त्यातच पावसाने ओढ दिल्याने नाशिककरांवर जलसंकट ओढवले. जुलै पर्यंत तरी शहराला पाणी पुरवठा होईल का अशी शंका निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर महापौर रंजना भानसी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी देखील केली होती.

शहरात गेल्या ३० जूनपासून सर्व विभागात एकवेळ पाणी पुरवठा करण्यात येत आहे. महापालिकेच्या सहा पैकी चार विभागात दोन वेळा पाणी पुरवठा होतो तो एकवेळ करण्यात आला. त्याच प्रमाणे पावसाने ओढ दिल्यानंतर दर गुरूवारी ड्राय डे म्हणजे कोरडा दिवस पाळुन पाणी पुरवठाच न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, जुलै महिन्याच्या प्रारंभी पासून इगतपुरी तसेच त्र्यंबकेश्वर आणि त्यानंतर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणातील ५३ टक्के साठा झाला आहे. त्यामुळे पाणी कपात अंशत: रद्द करण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाgangapur damगंगापूर धरणWaterपाणी