शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Ashok Kharat Case: लैंगिक छळाच्या आरोपांवरून अटक केलेल्या अशोक खरातला दणका; राज्य सरकारने SIT नेमली, फार्म हाऊसवर पिस्तुल सापडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 11:14 IST

Captain Ashok Kharat Case: संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या पथकाचे नेतृत्व डॅशिंग पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

Captain Ashok Kharat Case : नाशिकमधील 'कॅप्टन' अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणात आज एक मोठी अपडेट  समोर आली आहे. 'कॅप्टन' अशोक खरात प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या पथकाचे नेतृत्व डॅशिंग पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

गुंगी आणणारं पाणी पाजून लैंगिक अत्याचार; नाशकातील स्वयंघोषित ‘कॅप्टन’ ज्योतिषी अशोक खरातला बेड्या

गेल्या काही दिवसांपासून कॅप्टन खरात याच्यावर महिला अत्याचाराचे गंभीर आरोप होत होते. या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता सरकारने एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तेजस्वीनी सातपुते यांच्याकडे जबाबदारी आल्याने आता या प्रकरणाचा छडा अत्यंत वेगाने लागण्याची शक्यता आहे. खरातने यापूर्वी केलेले अन्य काही काळे कारनामे आणि त्याचे लागेबंधे आता एसआयटीच्या चौकशीत उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

फार्म हाऊसवर क्राईम ब्रँचचा मध्यरात्री छापा

कॅप्टन खरात सध्या नाशिक क्राईम ब्रँचच्या ताब्यात असून, त्याला २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोठडीत असतानाच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. क्राईम ब्रँचच्या पथकाने खरातच्या मिरगाव येथील फार्म हाऊसवर मध्यरात्री उशिरा मोठी छापेमारी केली. या कारवाईत पोलिसांच्या हाती धक्कादायक पुरावे लागले आहेत.

पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त

फार्म हाऊसच्या झाडाझडती दरम्यान पोलिसांना एक पिस्तूल सापडले आहे. यासोबतच काही वापरलेली आणि काही न वापरलेली (जिवंत) काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहेत. एका अत्याचार प्रकरणात आता बेकायदेशीर शस्त्रसाठा सापडल्याने खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. शस्त्रांशिवाय खरातच्या मालमत्तेचे महत्त्वाचे दस्तावेज आणि इतर काही संशयास्पद कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

नाशिक पोलिसांनी यापूर्वीच खरातच्या घराची झडती घेतली होती. आता फार्म हाऊसवर मिळालेले पुरावे आणि एसआयटीचा तपास यातून खरातचे मोठे रॅकेट उघड होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस आता जप्त केलेल्या कागदपत्रांची आणि मालमत्तेची चौकशी करत असून, यामागे आणखी कोणाचे पाठबळ होते का, याचाही शोध घेतला जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Govt Acts on Ashok Kharat Case; SIT Investigation Ordered

Web Summary : Maharashtra government orders SIT probe into Captain Ashok Kharat's alleged abuse case. Police raided his farmhouse, seizing a pistol and ammunition. Investigation led by officer Tejaswini Satpute aims to uncover Kharat's network.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकsexual harassmentलैंगिक छळAshok Kharatअशोक खरात