औद्योगिक महामंडळही करणार नाशिकचे ब्रॅँडिंग
By Admin | Updated: May 20, 2017 01:49 IST2017-05-20T01:46:24+5:302017-05-20T01:49:29+5:30
सातपूर : औद्योगिक विकास महामंडळ मोठ्या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी नाशिकचे जोरदार ब्रँडिंग करणार आहे

औद्योगिक महामंडळही करणार नाशिकचे ब्रॅँडिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
सातपूर : मुंबईत आयोजित ‘मेक इन नाशिक’ प्रदर्शनात उद्योगाशी संलग्न शासकीय विभागाचे स्टॉल्सदेखील राहणार आहेत. या स्टॉल्सच्या माध्यमातून औद्योगिक विकास महामंडळ मोठ्या उद्योगांना आकर्षित करण्यासाठी नाशिकचे जोरदार ब्रँडिंग करणार आहे. तशी तयारी करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी दिली आहे.
नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी मुंबईत ‘मेक इन नाशिक’ या उपक्र माचे नेहरू सेंटर येथे दि.३० व ३१ मे रोजी आयोजन करण्यात आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्र माचे उद््घाटन करण्यात येणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत. नाशिकमध्ये नवीन गुंतवणूक यावी यासाठी निमा, एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत मुंबईला ‘मेक इन नाशिक’ हा उपक्र म राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.