शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

By संजय पाठक | Updated: June 17, 2025 10:13 IST

Nashik News: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मोठ्या प्रमाणात आयारामांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार आज माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर माजी महापौर अशोक मूर्तडक यांच्यासह सुमारे 14 माजी नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार आहेत.

- संजय पाठक नाशिक- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मोठ्या प्रमाणात आयारामांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार आज माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर माजी महापौर अशोक मूर्तडक यांच्यासह सुमारे 14 माजी नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार आहेत मुंबईतील भाजपा कार्यालयात दुपारी एक वाजेच्या सुमारास हा प्रवेश सोहळा होणार असून त्यासाठी सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक खास बस आणि मोटारी करून मुंबईकडे रवाना झाले आहे.

राज्यात प्रथम सत्तेवर आलेल्या युती सरकारमध्ये बबनराव घोलप हे समाज कल्याण मंत्री होते त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांना अद्याप त्यांना उमेदवारी मिळू शकलेली नाही तर सुधाकर बडगुजर यांच्यावर अलीकडेच भाजपा चे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता यांच्याशी संबंध असल्याचा तसेच महापालिकेत ठेकेदारी करत असल्याचा आरोप केला होता.

विशेष म्हणजे बडगुजर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार आमदार सीमा हिरे यांना आव्हान दिले होते त्यावेळी याच आरोपांमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता त्यांना पक्षात घेऊ नये यासाठी भाजप आमदार सीमा हिरे यांनी प्रयत्न केले असतानाही त्यांना डावलून हा प्रवेश सोहळा होत आहे.

बडगुजर आणि घोलप यांच्याबरोबर माझी महापौर अशोक मूर्तडक, मनसेचे माजी शहर प्रमुख दिलीप दातीर, माजी नगरसेवक अशोक सातभाई, हर्षा बडगुजर, वंदना बिरारी यांच्यासह अन्य माजी नगरसेवक देखील प्रवेश करणार आहेत.

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपाBabanrao Gholapबबनराव घोलप