शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नाशिकमध्ये भाजप-सेनेत ‘सामना’ रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 02:25 IST

भाजपचे बहुमत असतानाही त्यांचे नगरसेवक फोडूून काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या मदतीने चमत्कार घडविण्याची शिवसेनेची तयारी आहे.

नाशिक : महापौरपदासाठी भाजप व शिवसेनेत सरळ ‘सामना’ होत आहे. भाजपचे बहुमत असतानाही त्यांचे नगरसेवक फोडूून काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या मदतीने चमत्कार घडविण्याची शिवसेनेची तयारी आहे, तर भाजपनेदेखील विरोधकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केल्याने प्रत्यक्ष काय घडणार हे सभागृहात ठरणार आहे.राज्यातील सत्ता समीकरणांचा परिणाम नाशिकमध्ये जाणवत आहे. शिवसेनेने पुढाकार घेऊन येथे राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसच्या मदतीने महाशिवआघाडी साकारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विरोधकांनीदेखील शिवसेनेला बऱ्यापैकी साथ दिली आहे. भाजपसोडून शिवसेनेत दाखल झालेल्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे समर्थक असलेले भाजपचे १0 नगरसेवक उघडपणे फुटले असून, त्यांनी पक्षाच्या आदेशाच्या विरोधात परस्पर अर्ज दाखल करणे तसेच सहलीला न जाण्याचे प्रकार केले. मनसेच्या पाच नगरसेवकांनी अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. राज ठाकरे शुक्रवारी ऐनवेळी निर्णय घोषित करणार आहेत. महापौरपदासाठी भाजपात दिनकर आढाव, शशिकांत जाधव आणि सतीश कुलकर्णी तर शिवसेनेत अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर आणि विलास शिंदे यांच्यात रस्सीखेच आहे.एकूण - १२२ (२ जागा रिक्त)भाजप - ६५ । शिवसेना ३४काँग्रेस - ६ । राष्ट्रवादी- ६मनसे - ५ । अपक्ष - ३रिपाइं (आठवले गट) - १

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपाShiv Senaशिवसेना