शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: पालकमंत्रिपदाच्या स्पर्धेत महाजन यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी, शिंदेसेनेला नमवण्यात भाजपला यश

By संजय पाठक | Updated: January 19, 2025 15:15 IST

Nashik News:  ज्याचे जास्त आमदार त्यांचा पालकमंत्री असा निकष सांगणाऱ्या राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटे आणि माझ्याबाबतीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनुकूल असे सांगणारे दादा भुसे या देाघांवर मात करून भाजपाने गिरीश महाजन यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती केली

- संजय पाठक नाशिक -  ज्याचे जास्त आमदार त्यांचा पालकमंत्री असा निकष सांगणाऱ्या राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटे आणि माझ्याबाबतीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनुकूल असे सांगणारे दादा भुसे या देाघांवर मात करून भाजपाने गिरीश महाजन यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती केली असून आगामी महापालिका आणि जिल्हा परीषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बाजी मारली आहे. विशेष म्हणजे माणिकराव कोकाटे यांना तरी नंदूरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहेत. मात्र,नाशिकचे माजी पालकमंत्री दादा भुसे यांना एकाही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणूका झाल्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता आली त्यावेळी मंत्री मंडळात समावेश हेाऊन नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि शिंदे सेनेचे दादा भुसे यांच्यात स्पर्धा असली तरी गिरीश महाजन यांचे नाव चर्चेत होते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर गिरीश महाजन यांना पक्षाने नाशिकपासून दूर ठेवले होते. मात्र, पक्षीय स्तरावर ते नाशिकला विविध कार्यक्रमांसाठी येतच हेाते. मात्र, राज्यात निवडणूका झाल्यानंतर अचानक नाट्यमयरीत्या छगन भुजबळ यांचे नाव मंत्रीमंडळातून वगळले गेले. अर्थात, त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची पालकमंत्रीपदासाठी इच्छा प्रबळ झाली. त्यांच्यात आणि दादा भुसे यांच्यात दावे प्रतिदावे सुरू असताना कोकाटे यांनी बाहेरील जिल्ह्यातील पालकमंत्री नको असेही म्हंटले होते मात्र, नाशिकला गिरीश महाजन यांनाच नियुक्त करून  ॲड. माणिकराव कोकाटे यानाही पर जिल्ह्यात म्हणजे नंदूरबारचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार