शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराकडून बलात्कार; नराधमाला काही तासांत बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 09:47 IST

या घटनेनंतर सिडकोसह शहर व परिसरात भीतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देनाशिकमध्ये पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगाराकडून बलात्कारब्यूटी पार्लरमध्ये बळजबरीने प्रवेश करीत महिलेला चाकूचा धाक दाखवून अत्याचारपोलिसांनी नराधमाला काही तासांत ठोकल्या बेड्या

नाशिक: डोंबिवलीतील बलात्काराची घटना ताजी असतानाच सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पॅरोलवर सुटलेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीने सिडको परिसरातील एका ब्यूटी पार्लरमध्ये बळजबरीने प्रवेश करीत तेथील एका महिलेला चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा नितीन अशोक पवार याला पोलिसांनी सीबीएस परिसरातून ताब्यात घेतले आहे. 

या घटनेनंतर सिडकोसह शहर व परिसरात भीतीचे वातावरण आहे. सोमवारी ब्यूटी पार्लरमध्ये संशयित नितीन सुभाष पवार (३२) हा बळजबरीने शिरला. त्याने चाकूचा धाक दाखवून तेथील एका महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याचे पीडितेने फिर्यादित म्हटले आहे. या घटनेनंतर मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत संशयित आरोपीचा शोध घेण्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 

सराईत गुन्हेगार जो पॅरोलवर बाहेर असताना गुन्हा करून फरार होतो आणि पोलिसांना त्याचा थांगपत्ता लागत नसल्याने अंबड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अंबड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच परिमंडळ अधिकाऱ्यांचा वचक गुन्हेगारांवर नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी सर्व शहानिशा करून सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. 

दरम्यान, नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे अंबड पोलीस ठाण्यात दाखल होत आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली होती. या फरार संशयित आरोपीचा अखेर काही तासात लागला आणि पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत त्याला पुन्हा जेरबंद करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक