नाशिकमध्ये सव्वा तास पावसाची जोरदार बॅटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 17:52 IST2019-10-06T17:52:23+5:302019-10-06T17:52:27+5:30
शहरामध्ये सुमारे सव्वा तासात मुसळधार पावसाने बॅटिंग केली,

नाशिकमध्ये सव्वा तास पावसाची जोरदार बॅटिंग
नाशिक : शहरामध्ये सुमारे सव्वा तासात मुसळधार पावसाने बॅटिंग केली, यामुळे नाशिक महापालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनासमोर शरणपूर रस्त्यापासून तर्फे गावठाणमधील जुने नाशिक भागातील रस्त्यापर्यंत पाण्याचे पाट वाहताना दिसून आले. शहरातील व्यापारी संकुलांमधील तर मध्ये पाण्याने भरले होते, गंगापूर धरण परिसरात पावसाची हजेरी नसली तरी सर्व उपनगरे या भागात जोरदार पावसाने झोडपून काढले, त्यामुळे गोदावरीची उपनदी नासर्डी ओसंडून वाहत आहे, त्यामुळे गोदावरीचे पातळी देखील वाढ झाली आहे, दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास शहर व परिसरात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला, चार वाजता जोरदार तरी अवघ्या सव्वा तासात शहर व परिसरात पावसाने धुमशान केलं. सध्या पावसाने उघडीप दिली आहे, त्यामुळे शहरातील रस्त्यांवरील वाहतूक पुन्हा पुन्हा पूर्ववत होताना दिसून येत आहे