नाशिक : ' तबला चिल्ला' कार्यक्रमाने जिंकली उपस्थितांची मनं
By Admin | Updated: January 28, 2017 20:41 IST2017-01-28T20:41:59+5:302017-01-28T20:41:59+5:30
ना तीं तीं ना ना धीं धीं ना या ताल त्रितालासह विविध पेशकार, कायदे, रेले यांचे सादरीकरण 'तबला चिल्ला' या कार्यक्रमात शनिवारी करण्यात आले.

नाशिक : ' तबला चिल्ला' कार्यक्रमाने जिंकली उपस्थितांची मनं
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २८ - ना तीं तीं ना ना धीं धीं ना या ताल त्रितालासह विविध पेशकार, कायदे, रेले यांचे सादरीकरण 'तबला चिल्ला' या कार्यक्रमात शनिवारी करण्यात आले. कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक आणि आदिताल तबला अकादमी यांच्यातर्फे तबला चिल्ला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तबला चिल्ला या कार्यक्रमांतर्गत देशातील विविध भागातील कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. शनिवार (दि. २८) आणि रविवार (दि. २९) असे दोन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी झालेल्या कार्यक्रमात संकेत फुलतानकर, सौरभ ठकार, शौनक राजहंस, निमिष घोलप, रसिक कुलकर्णी या नाशिकच्या कलाकरांसह कल्याण पांडे, सोहम गोराणे (पुणे), निसर्ग देहूकर (मुंबई), रामेंद्रसिंग सोलंकी (भोपाळ), पं मुकुंद भाले (खैरागड) यांनी तबलावादन करून उपस्थितांची मने जिंकली (प्रतिनिधी)