शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: आश्रमशाळेची वेळ बदलली; मात्र शिक्षक झाले नाराज

By संदीप भालेराव | Updated: July 12, 2023 13:51 IST

Nashik: आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा बदललेल्या वेळापत्रकानुसार सुरू झाल्या. मात्र, पहिल्याच दिवशी शिक्षकांनी बदलेल्या वेळेचा निषेध करीत काळ्या फीत लावून आंदोलन केले. आश्रमशाळांच्या

- संदीप भालेराव 

नाशिक - आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा बदललेल्या वेळापत्रकानुसार सुरू झाल्या. मात्र, पहिल्याच दिवशी शिक्षकांनी बदलेल्या वेळेचा निषेध करीत काळ्या फीत लावून आंदोलन केले. आश्रमशाळांच्या वेळा बदलल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होणार असल्याचा दावा करण्यात आला.

आदिवासी विकास विभागांच्या अंतर्गत असलेल्या आश्रमशाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेऊन सोमवार (दि. १०) पासून अंमलबजावणी सुरू झाली. नवीन वार्षिक वेळापत्रकानुसार सकाळी ८;४५ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शाळा भरणार आहे. मात्र, शाळेच्या पहिल्या दिवशीच राज्यभरातील शिक्षकांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवत, शाळेची वेळ विद्यार्थ्यांना गैरसोयीची असल्याचे म्हणत, वेळ पूर्ववत करण्याची मागणी केली.राज्यातील आश्रमशाळांमधून या निर्णयाला विरोध सुरू झाला असून, आता शासनाला पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी आश्रमशाळांमध्ये असलेले विद्यार्थी दुर्गम, डोंगराळ भागातून शाळेत येत असतात. शाळेची वेळ सकाळी ८:४५ वाजेची करण्यात आल्याने, विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहोचू शकणार नाहीत, किंबहुना त्यांना पहाटे लवकर उठावे लागले, तर त्यांची पुरेशी झोप होणार नसल्याने, विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही वेळ योग्य नसल्याचा दावा शिक्षक संघटनांनी केला आहे.

नव्या वेळापत्रकानुसार विद्यार्थी वेळेत शाळेत पोहोचू शकणार नाहीत, शिवाय पहिली ते चौथीच्या मुलांचा विचार या बदलात करण्यात आला नसल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे. सकाळची शाळा असल्याने मुलांना तत्पूर्वी दीड ते दोन तास आधी उठावे लागणार असल्याने, त्यांची पुरेशी झोप होणार नसल्याचा दावाही संघटना करीत आहेत. सकाळच्या शाळेची वेळ आणि दुपारच्या जेवणाचे वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी गैरसोयीचे ठरणार असल्याने मुलांच्या आरोग्याचाही विचार व्हावा, अशी शिक्षकांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांचे वेधणार लक्षराज्याच्या आदिवासी विभागाचे उपसचिव वि.फ. वसावे यांनी वेळापत्रक बदलाचे आदेश काढले आहेत. या आदेशाच्या विरोधात एकवटलेल्या शिक्षक संघटनांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न उपस्थित करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांना निवेदन पाठविले जाणार आहे, याशिवाय येत्या शनिवारी मुख्यमंत्री नाशिकला येणार असल्याने, त्यांची भेटही घेतली जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकNashikनाशिक