चित्र स्पर्धेत नाशिकच्या कलाकारांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 12:19 AM2020-09-10T00:19:42+5:302020-09-10T01:18:03+5:30

नाशिक : अहमदनगरच्या लायनेस क्लबतर्फे आयोजित चित्र स्पर्धेत खुल्या गटात नाशिकच्या कलाकार महिलांनी बाजी मारली, तर वारली चित्रकार संजय देवधर यांच्या ५ विद्यार्थिनींनी पारितोषिके पटकावली.

Nashik artists win in drawing competition | चित्र स्पर्धेत नाशिकच्या कलाकारांची बाजी

चित्र स्पर्धेत नाशिकच्या कलाकारांची बाजी

googlenewsNext
ठळक मुद्देदोन गटांमध्ये झालेल्या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अहमदनगरच्या लायनेस क्लबतर्फे आयोजित चित्र स्पर्धेत खुल्या गटात नाशिकच्या कलाकार महिलांनी बाजी मारली, तर वारली चित्रकार संजय देवधर यांच्या ५ विद्यार्थिनींनी पारितोषिके पटकावली.
आॅनलाइन चित्र स्पर्धेचे आयोजन लायनेस प्रांत ३२३४ डी २ तर्फे करण्यात आले. दोन गटांमध्ये झालेल्या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. खुल्या गटात प्रथम- रोहिणी बिचवे, द्वितीय- अ‍ॅड.अपूर्वा भंडारे (नाशिक) तृतीय- बीना केळकर (मिरज) व श्वेता शाह, चतुर्थ - विद्या शुक्ल (नाशिक), तर पाचवा क्रमाकं सोनाली केळकर (नाशिक) यांनी मिळवला. प्रवीण सारगे व आयुष पारिक यांना उत्तेजनार्थ पारितोषिक घोषित करण्यात आले. लायनेस सदस्यांच्या गटात प्रथम- मनीषा अग्रवाल (मनमाड), द्वितीय- अर्चना जगताप, तृतीय- रेवती मिंध्रे (पुणे) व किरण डागा (कोपरगाव), चतुर्थ- कविता कातकाडे आणि नीतू अहिरराव (मनमाड), तर पाचवा क्रमांक शोभा लवांदे (शिर्डी) यांनी मिळवला. उत्तेजनार्थ - गीतांजली बागडी (पुणे), सोनिया अग्रवाल व रेखा पाईक (मनमाड) यांना पारितोषिके जाहीर करण्यात आली.

Web Title: Nashik artists win in drawing competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.