शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: अल निनो आधीच नाशिककरांवर पाणी टंचाईचे संकट, पाणीसाठ्यात लक्षणीय घट, पाच तालुक्यात 21 टँकरने पाणी पुरवठा सुरू

By संजय पाठक | Updated: April 25, 2023 11:16 IST

Water Scarcity Crisis In Nashik: नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट होत असून सध्या एकूण साठवणुकीच्या 41 टक्के इतका साठा शिल्लक आहे.

- संजय पाठकनाशिक- जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर आता उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट होत असून सध्या 24 धरणांमध्ये 26 हजार 741 दशलक्ष घनफूट म्हणजेच एकूण साठवणुकीच्या 41 टक्के इतका साठा शिल्लक आहे.

नाशिक जिल्ह्यातील 29 गाव आणि दहा वाड्यांना 21 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाणी टंचाईची सर्वाधिक झळ येवला तालुक्याला बसली असून या तालुक्यातील 19 गावे आणि सात वाड्यांना 13  टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.  मालेगाव तालुक्यात तीन गावं आणि एका वाडीला 3 टँकरने तसेच देवळा आणि बागलाण मध्ये एकेक गाव तर चांदवड मध्ये पाच गावं आणि एका वाडीला टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मालेगावात 6 आणि देवळा तालुक्यात 3 या प्रमाणे 9 खासगी  विहिरींचे अधिग्रहण करण्यात  आले आहे.

यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून जुलै मध्ये पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता वर्तवली जात असताना आता पासून टँकरची संख्या वाढू लागली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईNashikनाशिक