शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 17:59 IST

मात्र दुपारी उशिरापर्यंत सहकार खात्याकडून कुठल्याहीप्रकारे बरखास्तीच्या कारवाईबाबतचे अधिकृत पत्र प्राप्त झाले नसल्याची माहिती उपसभापती संजय तुंगार यांनी दिली.

ठळक मुद्देहकार खात्याकडून समितीचे संचालक मंडळावर ठपका समितीचे संचालक मंडळ हे आता या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला जिल्हा निबंधकांनी ४५/१ची नोटीस बजावली होती. यानुसार सहकार खात्याने संचालक मंडळावर ठपका ठेवत बरखास्तीची कारवाई शनिवारी (दि.३०) केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पंधरा दिवसांनी प्रशासक अपर निबंधक धुरा घेणार असल्याचे जिल्हा निबंधक निळकंठ करे यांनी स्पष्ट केले.कर्जाच्या रकमेची थकबाकी, अंशदानाची रक्कम मुदतीत न भरणे, वकिलांचे शुल्क, विविध न्यायालयीन कामकाजावरील खर्च, अनावश्यक जाहिरातींवर केलेला खर्च, अनावश्यक रोजंदारीने कामगार नियक्ती, थकीत सुपरव्हिजन शुल्क, राज्य बाजार समिती संघाची थकविलेल्या रकमेचा मुदतीत भरणा न करणे, अशा एकूण दहा कारणांच्या आधारे बाजार समितीच्या संचालक मंडळाला नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर शनिवारी सहकार खात्याकडून समितीचे संचालक मंडळावर ठपका ठेवून ते बरखास्त करण्यात आल्याचे करे यांनी सांगितले; मात्र दुपारी उशिरापर्यंत सहकार खात्याकडून कुठल्याहीप्रकारे बरखास्तीच्या कारवाईबाबतचे अधिकृत पत्र प्राप्त झाले नसल्याची माहिती उपसभापती संजय तुंगार यांनी दिली.दरम्यान, समितीचे सभापती शिवाजीराव चुंभळे यांनी जिल्हा निबंधकांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने बरखास्तीच्या कारवाईपासून पुढे पंधरा दिवसांची मुदतीत पुन्हा न्यायालयात दाद मागण्याची मुदत संचालक मंडळाला दिली होती. यानुसार समितीचे संचालक मंडळ हे आता या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार आहे.बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाच्या शुकशुकाटबरखास्तीच्या कारवाईनंतर बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाच्या परिसरात शुकशुकाट जाणवत होता; मात्र बाजार समितीच्या आवारात दैनंदिन व्यवहार नित्यनेमाने सुरू होते. या कारवाईचा कुठलाही प्रभाव समितीमधील व्यवहारांवर दिसून आला नाही. कारवाईनंतर मात्र कुठलीही नोटीस कार्यालयाच्या परिसरात सहकार खात्याकडून लावल्याचे दिसून आले नाही.

 

टॅग्स :NashikनाशिकMarket Yardमार्केट यार्डagricultureशेती