शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक कृषी उत्पन्न बाजार  समिती संचालक मंडळ बरखास्त?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:18 IST

बहुचर्चित नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय झाल्याचे वृत्त आहे. गुरुवारी (दि. १६) पुणे येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या पणन महामंडळाच्या बैठकीत या बरखास्तीवर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर संचालकां- मध्ये या बरखास्तीची चर्चा सुरू होती.

नाशिक : बहुचर्चित नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय झाल्याचे वृत्त आहे. गुरुवारी (दि. १६) पुणे येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या पणन महामंडळाच्या बैठकीत या बरखास्तीवर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर संचालकां- मध्ये या बरखास्तीची चर्चा सुरू होती.  दरम्यान, या बरखास्तीच्या कारवाईबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अधिकृत काहीही माहिती नसल्याचे कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्तीच्या निर्णयाबाबत १४ आॅगस्ट रोजी अंतिम सुनावणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात झाली होती.त्यावेळी जिल्हा जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांच्याकडे संचालकांनी युक्तिवाद झाला. या युक्तिवादानंतर अहवाल सहकार व पणन खात्याकडे पाठविला जाणार होता. मात्र, दोन आठवडा हा अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयात पडून होता. अखेरला १९ आॅगस्ट रोजी हा अहवाल पणन महामंडळाकडे पाठविण्यात आला.  त्यामुळे पणन महामंडळ नेमका काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले होते. भाजपाकडून बरखास्तीची धास्ती दाखिवली असल्याचा आरोप विरोधकांनी करण्यास सुरुवात केली होती. गुरुवारी (दि.१६) पणन महामंडळाची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत, नाशिक बाजार समिती बरखास्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची चर्चा आहे. बाजार समितीतील संचालक मंडळाने केलेला गैरव्यवहार, अनियमित कामकाज असा ठपका ठेवण्यात आला होता. त्यावर चौकशी समिती नेमून चौकशी झाली होती. या चौकशी अहवालात अनियमतता झाल्याचे सांगत, समिती बरखास्त करण्याची शिफारस केली होती. त्यावर बाजार समितीला नोटीस पाठविण्यात आली होती. बरखास्तीचा निर्णय झाल्याचे कळताच काही संचालकांनी एकत्र येत शुक्रवारी (दि.१७) जिल्हा परिषदेत बैठक घेतल्याचे समजते. या बैठकीत पुढे काय यावर चर्चा झाल्याचे समजते.दुजोरा नाहीनाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त कार्यवाहीचा अहवाल राज्य शासनाच्या पणन महामंडळाकडे पाठविण्यात आलेला आहे. मात्र, बरखास्त करण्याबाबत कोणतेही पत्र प्राप्त झालेले नाही.  - नीळकंठ करे,  जिल्हा उपनिबंधक, नाशिक

टॅग्स :market yardमार्केट यार्डNashikनाशिक