शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : भाव घसरल्याने शेतक-यांनी कोथिंबीर फेकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 22:28 IST

नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सायंकाळी कोथिंबीर मालाची मोठ्या प्रमाणात आवक होऊन बाजारभाव कोसळल्याने शेतक-यांना कोथिंबीर फेकून द्यावी लागली. तर काही शेतक-यांनी  आणलेला कोथिंबीर माल पुन्हा वाहनात भरून आपल्या जनावरांसाठी नेला. लिलावात कोथिंबीरला अवघा एक रुपया जुडी असा भाव मिळाला.दोन दिवसांपूर्वी झालेल्या ओखी वादळामुळे मुंबईत शेतमालाला उठाव नसल्याने त्याचा ...

ठळक मुद्देसध्या पालेभाज्यांना पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कोथिंबीरची आवक वाढली आहे.लिलावात कोथिंबीरला अवघा एक रुपया जुडी असा भाव

नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सायंकाळी कोथिंबीर मालाची मोठ्या प्रमाणात आवक होऊन बाजारभाव कोसळल्याने शेतक-यांना कोथिंबीर फेकून द्यावी लागली. तर काही शेतक-यांनी  आणलेला कोथिंबीर माल पुन्हा वाहनात भरून आपल्या जनावरांसाठी नेला. लिलावात कोथिंबीरला अवघा एक रुपया जुडी असा भाव मिळाला.दोन दिवसांपूर्वी झालेल्या ओखी वादळामुळे मुंबईत शेतमालाला उठाव नसल्याने त्याचा परिणाम बाजारभावावर झालेला होता. मंगळवारी सकाळपासून ढगाळ हवामान व त्यातच पावसाने हजेरी लावली होती. दिवसभर पावसाचे वातावरण असल्याने मंगळवारी शेतमालाला कमी प्रमाणात उठाव असल्याने नाशिक बाजार समितीत बाजारभाव घसरलेले होते.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबई शहर तसेच उपनगरात दैनंदिन मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांची निर्यात केली जात असते. मंगळवारी सायंकाळी मेथी भाजी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झालेली होती, परंतु मुंबईला पाऊस असल्याने तसेच शेतमालाला उठाव नसल्याने मेथीला मातीमोल बाजारभाव होता. सध्या पालेभाज्यांना पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कोथिंबीरची आवक वाढली आहे.काही दिवसांंपूर्वी सुमारे २७५ रुपये असा विक्र मी बाजारभाव गाठून सर्वसामान्य ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणा-या कोथिंबीरचे बाजारभाव गुरुवारी पूर्णपणे घसरल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. मात्र चांगला बाजारभाव न मिळाल्याने कोथिंबीर उत्पादन करणा-या शेतकरी बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त करून कोथिंबीर बाजार समितीत फेकून देत काढता पाय घेतला. नाशिकमधून मुंबईला कोथिंबीर माल रवाना करण्यात आला मात्र पुणे, खेड, मंचर या भागातील कोथिंबीर मुंबई बाजारात दाखल होत असल्याने तसेच गुजरात राज्यातही स्थानिक कोथिंबीर माल दाखल होत असल्याने गुजरातची निर्यात थांबली आहे. परिणामी उठाव कमी झाल्याने बाजारभाव ढासळले आहेत.

टॅग्स :market yardमार्केट यार्डNashikनाशिकagricultureशेतीFarmerशेतकरी