शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या २३ गावांना लष्करी गोळीबाराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 15:46 IST

लष्कराकडून नेहमीच गोळीबाराचे तसेच तोफखान्याचे प्रात्याक्षिके सादर केली जात असल्यामुळे त्याची आगावू सुचना लष्करी हद्दीला लागून असलेल्या गावांना दिली जाते. त्यानुसार २७ फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणात

ठळक मुद्देखबरदारीचा इशारा : दिवसभर संकटनागरिक व जनावरांच्या जिवीताला धोका उद्भवण्याची शक्यता

नाशिक : देवळाली आर्टीलरी स्कूल मार्फत एक्स सेक्टरमध्ये २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत लष्कराच्या गोळीबाराचा सराव होणार असल्यामुळे लष्करी हद्दीला लागून असलेल्या इगतपुरी व नाशिक तालुक्यातील २३ गावांतील नागरिक व जनावरांच्या जिवीताला धोका उद्भवण्याची शक्यता लष्कराने वर्तविली आहे.या संदर्भात अपर जिल्हा दंडाधिका-यांनी नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. लष्कराकडून नेहमीच गोळीबाराचे तसेच तोफखान्याचे प्रात्याक्षिके सादर केली जात असल्यामुळे त्याची आगावू सुचना लष्करी हद्दीला लागून असलेल्या गावांना दिली जाते. त्यानुसार २७ फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणात होणा-या सरावामुळे धोक्याच्या पातळीत असलेल्या इगतपुरी तालुक्यातील टाकेद खुर्द, अधरवड, बेळगाव त-हाळे, सोनांशी, आडसर खुर्द, वारशिंगवणे, तळवाडी, कवाडदरा, समनेरे, घोटी खुर्द, लहान घोटीची वाडी, नांदुरवैद्य, टाकेद ब्रुदूक, धामणगाव, नांदगाव बुद्रूक, साकुर दुमला, बेळगाव कुºहे, मालुंजे, गंभीरवाडी, भरविर खुर्द, लहवित, अस्वली आणि नाशिक तालुक्यातील वंजारवाडी या गावातील नागरिकांनी धोक्याच्या हद्दीत प्रवेश करू नये तसेच स्व:ची जनावरेही या भागात जाऊ देऊ नये. नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध मॅन्युव्हर्स फिल्ड फायरिंग अ‍ॅण्ड आर्टीलरी प्रॅक्टीसेस कायद्यान्वये कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :fireआगNashikनाशिक