शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: नाशिकच्या सिडकोमध्ये मद्यधुंद गावगुंडांनी कोयत्याने फोडल्या १६ कार; दहशत पसरवण्याचा प्रयत्न

By अझहर शेख | Updated: July 12, 2023 13:46 IST

Nashik: कोयते नाचवून दहशत पसरविण्याचे प्रकार सिडकोमध्य नेहमीच घडतात; मात्र पोलिसांना हे प्रकार रोखण्यास सपेशल अपयश येत असल्याची टीका होत आहे.

- नरेंद्र दंडगव्हाळनाशिक  : कोयते नाचवून दहशत पसरविण्याचे प्रकार सिडकोमध्य नेहमीच घडतात; मात्र पोलिसांना हे प्रकार रोखण्यास सपेशल अपयश येत असल्याची टीका होत आहे. बुधवारी (दि.१२) पहाटे तीन वाजेच्या सुमारास दोन मद्यधुंद गावगुंडांनी हातात कोयते घेऊन रहिवाशांच्या अंगणातील एक- दोन नव्हे, तर तब्बल १६ कार, एका रिक्षाची तोडफोड करत दहशत पसरविली. त्रिमूर्ती चौकातील हेडगेवारनगरमध्ये हा प्रकार सुरू असताना अंबड पोलिसांच्या गस्तीपथकाला त्याचा मागमुसही लागला नाही हे विशेष!

कामगारांची वसाहत म्हणून ओळख असलेल्या सिडको येथील त्रिमूर्ती चौकाजवळ हेडगेवानगरमध्ये पहाटे तीन वाजेच्या सुमारास रहिवासी साखरझोपेत असताना अचानकपणे जोरजोराने तोडफोडीचा आवाज सुरू झाला. रहिवासी हादरून झोपेतून जागे झाले. घराबाहेरील दिवे सुरू करून बघितले असता दोन मद्यधुंद गावगुंड हातात कोयत्यासारखे धारदार शस्त्रे घेत मनात येईल त्याप्रमाणे कारच्या काचा फोडत होते. एका इसमाने हा सगळा प्रकार बघून धाडस करत घराबाहेर जात त्या गावगुंडांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यास कोयत्याचा धाक दाखवत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. सोळा मोटारी व एका रिक्षाची तोडफोड झाल्यानंतर घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ व त्यांच्या पथकाने संशयित गावगुंड जयेश हर्षवर्धन भालेराव (२०) व सूरज दिलीप चव्हाण (१९, दोघे रा. दुर्गानगर, सिडको) यांना बेड्या ठोकल्या.

संशयित जयेश व सूरज या दोघांनी दारूच्या नशेत हेडगेवार चौकात हातात कोयता हाती घेत दहशत पसरविण्याचा प्रकार केला. दरम्यान, मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास दोघे गुंड परिसरात दहशत पसरवित होते. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. यावेळी परिसरातील नागरिक संदीप आहेर हे घरातून बाहेर आले व त्यांनी या दोघांना गाड्यांचे नुकसान करताना बघितले असता त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघा संशयितांनी आहेर यांना शास्त्राचा धाक दाखवत जागीच ठार मारून टाकेन, असे धमकावले. आहेर यांच्या तक्रारीवरून अंबड पोलिसांनी संशयित आरोपी जयेश भालेराव व सूरज चव्हाण या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी