नाशिकरोडला नालेसफाई सुरु

By Admin | Updated: June 11, 2014 00:21 IST2014-06-10T23:23:12+5:302014-06-11T00:21:17+5:30

नाशिकरोडला नालेसफाई सुरु

Nasalpai to Nashik Road | नाशिकरोडला नालेसफाई सुरु

नाशिकरोडला नालेसफाई सुरु

 

नाशिकरोड : परिसरात मनपाच्या वतीने पावसाळ्यापूर्वी गटारी व नाले साफसफाईचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांत झालेल्या पावसात अनेक ठिकाणी गटारी, नाले तुंबून पावसाचे पाणी परिसरात साचल्याने रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. सदर बाब लक्षात घेऊन यंदा मनपाच्या वतीने पावसाळ्यापूर्वी जयभवानीरोड, गोसावीवाडी, सिन्नरफाटा आदि ठिकाणच्या नैसर्गिक नाल्यातील गाळ, घाण, केरकचरा जेसीबीच्या साह्याने काढला जात आहे. जुन्या नैसर्गिक नाल्यासोबत पावसाळी गटारीदेखील अनेक ठिकाणी तुंबल्या आहेत. पावसाळ्यात गटारीच्या चेंबरमधून मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून पाणी वाहते. नैसर्गिक नाले साफ करण्याबरोबर पावसाळी पाण्याच्या भूमिगत गटारीदेखील स्वच्छ करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Nasalpai to Nashik Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.