नासाका मदतीसाठी केंद्राला साकडे

By Admin | Updated: August 13, 2014 00:41 IST2014-08-13T00:28:54+5:302014-08-13T00:41:36+5:30

नासाका मदतीसाठी केंद्राला साकडे

Nasaka to help the center | नासाका मदतीसाठी केंद्राला साकडे

नासाका मदतीसाठी केंद्राला साकडे

नाशिकरोड : नाशिक सहकारी साखर कारखान्याचा चालू गळीत हंगाम सुरू करण्यासाठी केंद्र शासनाने आर्थिक सहाय्य करावे, या मागणीचे निवेदन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आले.
खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे अध्यक्ष देवीदास पिंगळे, उपाध्यक्ष जगन आगळे यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षापासून नासाकाचा गळीत हंगाम ऊस असतानाही केवळ जिल्हा बॅँकेने कर्ज उपलब्ध करून न दिल्याने होऊ शकला नाही. यामुळे ऊस उत्पादक व कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना आर्थिक फटका सहन करावा लागला. याबाबत कारखान्याची सध्याची स्थिती, कारखान्याकडे बॅँकेचे असलेले कर्ज व गुदामामध्ये शिल्लक असलेली ३० कोटी रुपयांची साखर, कामगारांचे थकीत पगार आदि विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नाशिक साखर कारखाना सुरू करण्यासाठी आपण स्वत: जातीने लक्ष घालू, असे आश्वासन गडकरी यांनी दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Nasaka to help the center