खामखेडा : म्हातारपणाचे ओझे घेऊन अन् काठीचा आधार घेत अनेक वयोवृद्ध जीवन जगत असतात.आयुष्याच्या साठीतील अनेक वयोवृद्धांना कोणाच्या आधाराशिवाय चालताही येत नाही, मात्र मोठ्या अपघातातून वाचत पायात दोन ठिकाणी रॉड असताना अशा परिस्थितीत बागलाण तालुक्यातील तळवाडेदिगर येथील ६६ वर्ष वयाचे कृष्णा रौंदळ आपल्या सोबत सहा सहकाऱ्यांना घेत अवघड अशी नर्मदा परिक्रमा दुसऱ्यांदा पूर्ण करत आहेत. त्यांच्या सोबत जिभाऊ सोनवणे (६६), दत्तू तिवारी (६९) ,दिगंबर मोरे (६२), जनार्दन जाधव (६१),नारायण निकम (५८) , विमल मोरे (५७) यांचाही समावेश आहे. या सर्वांना सोबत घेत दुसऱ्यांदा परिक्रमेसाठी निघाले आहेत.ते सध्या मध्य प्रदेशातील होलीपुरा या ठिकाणी पोहचले असून ,५४ दिवसांत त्यांनी २३०० किमीचा प्रवास पूर्ण केला आहे. अजून तेराशे किमीचा प्रवास राहिला आहे.
सहा वृद्धांची नर्मदा परिक्रमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 00:45 IST
खामखेडा : म्हातारपणाचे ओझे घेऊन अन् काठीचा आधार घेत अनेक वयोवृद्ध जीवन जगत असतात.आयुष्याच्या साठीतील अनेक वयोवृद्धांना कोणाच्या आधाराशिवाय चालताही येत नाही, मात्र मोठ्या अपघातातून वाचत पायात दोन ठिकाणी रॉड असताना अशा परिस्थितीत बागलाण तालुक्यातील तळवाडेदिगर येथील ६६ वर्ष वयाचे कृष्णा रौंदळ आपल्या सोबत सहा सहकाऱ्यांना घेत अवघड अशी नर्मदा परिक्रमा दुसऱ्यांदा पूर्ण करत आहेत.
सहा वृद्धांची नर्मदा परिक्रमा
ठळक मुद्देते सध्या मध्य प्रदेशातील होलीपुरा या ठिकाणी पोहचले