शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ओझर विमानतळावर आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 13:16 IST

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेसाठी नाशिकमध्ये येत असून त्यांचे विमान काही मिनिटांपुर्वीच ओझरच्या विमानतळावर उतरले आहेत.

ठळक मुद्देदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेसाठी नाशिकमध्ये येत असून त्यांचे विमान काही मिनिटांपुर्वीच ओझरच्या विमानतळावर उतरले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी पूर्ण झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप मोदी यांच्या सभेने होणार आहे.

नाशिक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाच टप्प्यातील राज्यस्तरीय महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकच्या तपोभूमीतून गुरूवारी (19 सप्टेंबर) होत आहे. यानिमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेसाठी नाशिकमध्ये येत असून त्यांचे विमान काही मिनिटांपुर्वीच ओझरच्या विमानतळावर उतरले आहेत. तेथून ते सभास्थळाच्या जवळ हेलिकॉप्टरने येणार असून दीड किलोमीटरचा रस्ता प्रवास करून ‘कॅन्वॉय’ थेट तपोवनातील साधुग्राम येथील सभास्थळी अवघ्या काही मिनिटांत पोहचणार आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी पूर्ण झाली. विशेष सुरक्षा दलाच्या (एसपीजी) ताफ्याने रंगीत तालीम पूर्ण करत सभास्थळाची चाचपणी बुधवारीच पुर्ण केली होती. बुधवारी दूपारपासून व्यासपीठासह संपूर्ण ‘डी-झोन’चा ताबा या दलाच्या कमांडोकडे आहे. या परिसरात पोलीस आयुक्त, पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी वगळता अन्य सर्व पोलीस अधिकाऱ्यांसह राजकीय नेत्यांना प्रवेशास मज्जाव करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप मोदी यांच्या सभेने होणार आहे. मोदी यांना 7 स्तरीय सुरक्षा प्रदान करण्यात आल्यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षाव्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. मुंबई, अहमदनगर, धुळे, जालना, सांगली, सोलापूर, पुणे यांसह सुमारे 12 शहरांमधून आलेल्या बॉम्ब शोधक-नाशक पथकाने तपोवनसह साधुग्रामचा संपूर्ण परिसर पिंजून काढला आहे. मुंबई गुन्हे शोध श्वान पथकानेही सभास्थळाची कसून तपासणी केली आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणेचे विशेष सुरक्षा दल (एसपीजी), मुंबईचे फोर्स-1 आणि विशेष सुरक्षा गटाचे (एसपीयू) कमांडो शहरात दाखल झाले आहेत. तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, स्ट्रायकिंग फोर्सचे जवानदेखील बंदोबस्ताला राहणार आहे.

मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुमारे 5 हजार पोलीस तपोवनात दाखल झाल्याने परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी मोदी यांच्या सभेच्या बंदोबस्ताचे सुक्ष्म नियोजन केले आहे. सुरक्षाव्यवस्थेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. सभेला येणाऱ्या प्रत्येकाची झाडाझडती घेऊन धातुशोधक यंंत्राने तपासून डोममध्ये प्रवेश दिला जात आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रामदास पाटील, चंद्रकात पाटील, गिरीष महाजन, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे या मंत्र्यांसह विविध खासदार, आमदार व्यासपिठावर उपस्थित झाले आहेत. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNashikनाशिकMaha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस