अभाविप महानगर अध्यक्षपदी नरेंद्र देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:11 IST2020-12-23T04:11:56+5:302020-12-23T04:11:56+5:30

निर्वाचन अधिकारी म्हणून सावित्रीबाई पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राचे समन्वयक डॉ. प्रशांत टोपे उपस्थित होते. त्यांनी संघटनेची नवीन कार्यकारिणी ...

Narendra Deshmukh as Abhavip Mahanagar President | अभाविप महानगर अध्यक्षपदी नरेंद्र देशमुख

अभाविप महानगर अध्यक्षपदी नरेंद्र देशमुख

निर्वाचन अधिकारी म्हणून सावित्रीबाई पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राचे समन्वयक डॉ. प्रशांत टोपे उपस्थित होते. त्यांनी संघटनेची नवीन कार्यकारिणी घोषित केली. नाशिक जिल्हा संयोजक अथर्व कुलकर्णी यांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० चा आढावा घेत वर्षभरातील कार्यक्रम आंदोलन व कामांचा उल्लेख केला. अभाविपचे नवनिर्वाचित महानगर मंत्री सिद्धेश खैरनार यांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची आगामी दिशा मांडली. सूत्रसंचालन प्रियंका पाटील यांनी केले. सौरभ धोत्रे यांनी आभार मानले.

इन्फो -

अभाविप नाशिक महानगर कार्यकारिणी

अध्यक्ष :- प्रा.डॉ.नरेंद्र देशमुख.

महानगरमंत्री :- सिद्धेश खैरनार

महानगरसहमंत्री :- ओम माळुंजकर

:- सौरभ धोत्रे

:- तेजल चौधरी

:- दिव्या सिंग

कार्यालय मंत्री :- रोहित सोनी

Web Title: Narendra Deshmukh as Abhavip Mahanagar President